विशेष प्रतिनिधी
बरेली : हिंदू कार्यकर्त्याचा शिरच्छेद करण्यासाठी एक कोटी रुपयांच्या इनामाची घोषणा करणाºया मदरसा शिक्षकाला पोलीसांनी अटक केली आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.Reward of one crore rupees for beheading a Hindu activist,Maulana arrested
उत्तर प्रदेशातील बरेली येथील ३२ वर्षीय मौलाना हाफिज फैजान रजा नावाच्या एका मदरशातील शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्याने उत्तराखंड येथील एका हिंदू कार्यकर्त्याचा शिरच्छेद करणाºयास एक कोटी रुपयांचे इनाम देण्याची घोषणा केली होती.
हिंदू भारती हे मुस्लिम समाजाच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांचा शिरच्छेद केला पाहिजे असे त्याने म्हटले होते. मौलानाने म्हटले आहे की इस्लामच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याचा विरोध केला जाईल. त्याला धडा शिकविला जाईल.
बरेली पोलीसांना याबाबतची माहिती मिळाल्यावर दोन समाजात तेढ वाढविण्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ईज्जतनगर पोलीसांनी त्याला अटक केली आहे. हिंदू भारती हे उत्तराखंड संरक्षण अभियानाचे संस्थापक आहेत.
या घटनेची माहिती पोलीसांना समजल्यावर मौलानाने लगेच एक व्हिडीओ टाकला. त्यामध्ये तो माफी मागताना दिसत आहे. त्याचबरोबर मौलानाच्या सहकाºयांनी त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याचेही म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App