रायबरेलीची “अमेठी” होणार म्हणजे काय होणार? रायबरेलीत पूर्वी असे कधी घडलेय? तिथे कोण पराभूत झालेय?


विशेष प्रतिनिधी

रायबरेली : काँग्रेसच्या ३५ जुन्या नेत्यांनी – पदाधिकाऱ्यांनी रायबरेलीत काँग्रेसला धक्का दिलाय. काँग्रेस नेत्यांसाठी हा देशासाठी हा सर्वांत हायप्रोफाइल मतदारसंघ. इथून सध्याच्या पिढीला फक्त सोनिया गांधी निवडून येताहेत एवढेच माहिती आहे. पण त्यापूर्वीचा इतिहास फारच थोड्या लोकांना माहिती आहे… रायबरेली हा मतदारसंघ दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा… १९७७ पूर्वीच्या प्रत्येक निवडणूकीत त्यांनीच या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. त्यांच्यामुळेच हा सामान्य नाव असलेला मतदारसंघ ग्लॅमरस बनला… indira gandhi and sanjay gandhi lost raibareli and ameth respectively in 1977, will sonia gandhi be able retain this seat in 2024

इंदिराजींनंतर सोनियाजी तिथून निवडून जायला लागल्या… पण याच मतदारसंघातील मतदारांनी दस्तुरखुद्द इंदिरा गांधींना पराभवाची धूळ चारली आहे. अमेठीत १९७७ मध्ये संजय गांधी पराभूत झाले होते. २०१९ मध्ये राहुल गांधी पराभूत झाले आहेत.होय, इंदिराजी रायबरेलीतून हरल्या आहेत. आणीबाणीच्या काळ्या कालखंडानंतरच्या निवडणूकीत रायबरेलीच्या जनतेने त्यांना नाकारले आहे. त्यावेळी जनता पक्षाचे उमेदवार आणि राजकारणात विदूषक म्हणून ओळखले जाणारे नेते राजनारायण यांनी त्यांना पराभूत केले होते.

जनसत्ताचे दिवंगत पत्रकार जनार्दन ठाकूर आणि केसरीचे सहसंपादक वि. स. वाळिंबे हे त्यावेळी रायबरेलीतून रिपोर्टिंग करत होते. त्यांनी हे नेते जनताचे या पुस्तकात रायबरेलीतील राजकीय वातावरणाची चपखल शब्दांमध्ये छबी टिपली आहे. इंदिराजी पराभूत होतील, अशी कोणालाही स्वप्नातही कल्पना नव्हती. त्यांचा प्रचारही जोरात होता. संजय गांधी त्यांच्या दिमतीला होते. राजनारायण त्यामानाने शुल्लक आव्हान उभे करू शकणारे नेते होते… अनुकूल निकालाचा आत्मविश्वास फक्त राजनारायण यांनाच होता. पण इतर कोणी त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हते. २० मार्च या दिवशी मतमोजणी सुरू झाली. पहिल्यांदा मोजलेल्या टपालाच्या मतांमध्ये इंदिराजींना १९० तर राजनारायण यांना १०१ मते मिळाली होती. राजनारायण म्हणाले, हा आकडा शुभ आहे.

रायबरेबलीत सुमारे साडेतीन लाख मतदान झाले होते. सायंकाळी ६.०० वाजता राजनारायण १४ हजार मतांनी आघाडीवर होते. (हे सगळे नंतर कळले) पण निकाल जाहीर करण्यात आला नाही. मतमोजणी सावकाश करा, असे गृहराज्यमंत्री ओम मेहता यांनी रायबरेलीचे जिल्हाधिकारी विनोद मल्होत्रांना फोनवरून सांगितले होते. जवळजवळ सगळ्या केंद्रीय मंत्र्यांनी मतमोजणी थांबविण्याचा प्रयत्न केला. आर. के. धवन आणि माखनलाल फोतेदार या इंदिराजींच्या अत्यंत विश्वासू अधिकाऱ्यांनी मल्होत्रांवर सातत्याने दबाव ठेवला होता. बीबीसीने सूत्रांच्या माहितीच्या आधारे रात्री ९.३० वाजता इंदिराजी पराभूत झाल्याची बातमी दिल्लीतून दिली. केंद्रीय मंत्री त्या बातमीला रोखू शकले नाहीत. पण विनोद मल्होत्रांवर ते दबाव आणत राहिले.

अखेर रात्री ३.०० वाजता निकाल जाहीर केला. इंदिरा गांधी १,२२,५१७ मते… राजनारायण १,७७,७१९ मते. राजनारायण विजयी झाले.

indira gandhi and sanjay gandhi lost raibareli and ameth respectively in 1977, will sonia gandhi be able retain this seat in 2024

रायबरेलीच्या मतदारांनी इतिहास घडविला होता. ५८० आठवड्यांची इंदिरा गांधींची आणीबाणीची राजवट संपुष्टात आणली होती… अशी ही रायबरेली आहे… तेथे १९७७ नंतर २०२१ मध्ये ४४ वर्षांनी काँग्रेसमध्ये मोठी घडामोड घडते आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था