राहुल गांधींच्या उमेदवारीला मुस्लिम लीग आणि PFI दहशतवादी संघटनेचा पाठिंबा; पण मुस्लिम लीगचे झेंडे वायनाडच्या रॅलीत लपवले!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या वायनाड मधल्या उमेदवारीला मुस्लिम लीग आणि बंदी घातलेली दहशतवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI यांनी पाठिंबा व्यक्त केला, पण राहुल गांधींच्या कालच्या रॅलीत मात्र मुस्लिम लीगचे झेंडे मुद्दामून लपविले गेले. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे राहुल गांधींची उमेदवारी अडचणीत आली आहे. Rahul Gandhi’s candidature supported by Muslim League and PFI terrorist organization

राहुल गांधींनी काल वायनाड मधून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केला. यावेळी वायनाड शहरातून त्यांनी मोठी रॅली काढली. या रॅलीत काँग्रेसचा सहयोगी पक्ष मुस्लिम लीग सामील झाला होता. त्यांचे काही कार्यकर्ते देखील या रॅलीमध्ये झेंडे घेऊन सामील झाले होते. परंतु, मुस्लिम लीगचे झेंडे राहुल गांधींच्या आसपास दिसू नयेत म्हणून काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मुस्लिम लीगचे झेंडे घेतलेल्या कार्यकर्त्यांना राहुल गांधींपासून दूर बाजूला सारून दिले.



मुस्लिम लीगचे झेंडे त्यांच्या हातातून घेऊन ते लपविले. परंतु, या सगळ्या घटना क्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे राहुल गांधींची उमेदवारी वेगळ्या प्रकारे अडचणीत आली. राहुल गांधी हे उत्तर भारतामध्ये वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शने घेतात. त्यातून त्यांनी स्वतःची प्रतिमा सॉफ्ट हिंदुत्वाची केली आहे. परंतु, वायनाड मध्ये मात्र त्यांच्याभोवती जर मुस्लिम लीगचे चांद ताऱ्याचे झेंडे दिसले, तर त्यांची मोठी राजकीय अडचण होऊ शकते, हे लक्षात घेऊन वायनाडच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम लीगचे झेंडे लपवण्याचा प्रयत्न केला.

त्याचवेळी राहुल गांधींना केरळमध्ये बंदी घातलेली संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI च्या राजकीय विंगने पाठिंबा दिला. त्या संघटनेचे कार्यकर्तेही झेंडे घेऊन राहुल गांधींच्या रॅलीत सामील झाले. परंतु, त्यांनाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी लांबच ठेवले. भाजपचे वायनाडचे उमेदवार आणि केरळचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी नेमका हाच मुद्दा आपल्या आजच्या प्रचारात उचलून धरला. के. सुरेंद्रन यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा रॅलीत स्मृती इराणी सामील झाल्या. स्मृती इराणी यांनी अमेठी मध्ये जसा राहुल गांधींचा पराभव केला, तसा वायनाड मध्ये आपण राहुल गांधींचा पराभव करू असा विश्वास के. सुरेंद्रन यांनी व्यक्त केला.

Rahul Gandhi’s candidature supported by Muslim League and PFI terrorist organization

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात