…तिथे राहुल गांधी निवडणूक निक्कीच जिंकतील – हिमंता सरमा

Rahul Gandhi will definitely win the election in Pakistan - Himanta Sarma

जाणून घ्या, नेमक्या कुठल्या निवडणुकीचा केला आहे उल्लेख


विशेष प्रतिनिधी

पाकिस्तानचे माजी मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केलेली स्तुती हा भारतातील निवडणुकीचा मुद्दा बनला आहे. आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी याचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी पाकिस्तानमध्ये खूप लोकप्रिय आहेत. पाकिस्तानात कोणत्याही निवडणुका झाल्या तर तेथे राहुल गांधी नक्कीच मोठ्या फरकाने विजयी होतील.Rahul Gandhi will definitely win the election in Pakistan – Himanta Sarma



फवाद चौधरी यांनी राहुल गांधींच्या स्तुतीबद्दल विचारले असता, मुख्यमंत्री हिमंता म्हणाले, ‘राहुल गांधी तिथून (पाकिस्तान) उभे राहिले तर ते नक्कीच मोठ्या मतांनी विजयी होतील. राहुल गांधींशी आम्ही पाकिस्तानात जिंकू शकणार नाही. राहुल गांधी पाकिस्तानातील निवडणुकीत नक्कीच जिंकतील. पण सत्य हे आहे की पाकिस्तानला जे हवे आहे, त्याच्या उलट भारतात होईल.

राहुल गांधींवर टीका करताना सरमा असंही म्हणाले की, राहुल गांधी पाकिस्तानमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. ते तिथून सहज निवडणुका जिंकू शकतात पण भारतात ते जिंकू शकत नाही. भारतात फक्त नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहतील.

Rahul Gandhi will definitely win the election in Pakistan – Himanta Sarma

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात