नाशिक : “नीट” पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पण त्या राजीनाम्याचे श्रेय काँग्रेस सह बाकीच्या विरोधी पक्षांना मिळण्याऐवजी कॉकरोच जनता पार्टीला मिळाले त्यामुळे राहुल गांधी अस्वस्थ झाले आणि त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रूपाने “नवे टार्गेट” शोधले. त्यांनी लोकसभेमध्ये अमित शाह यांना टार्गेट केलेच पण त्याबरोबरच आज काँग्रेसच्या इंदिरा भवन या मुख्यालयात प्रेझेंटेशनची पत्रकार परिषद घेऊन पुन्हा अमित शाह यांनाच टार्गेट केले. त्यासाठी त्यांनी पॅलेट गन मधून गोळीबार झाल्याचा आरोप रिपीट केला.
– राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा प्रश्न राहुल गांधींनी आधी उचलला होता, पण सरकारने त्याला बिलकुल प्रतिसाद दिला नव्हता. उलट संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आमचे सरकार हे काँग्रेस प्रणित युपीएचे सरकार नाही त्यामुळे आमच्या मंत्र्यांचे राजीनामे होत नाहीत असा टोमणा काँग्रेस आणि राहुल गांधींना मारला होता.
– प्रधानांच्या राजीनामाचे श्रेय कॉकरोचला
पण त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन पेटले. त्यामध्ये समाजकंटक आणि देश विघातक घटक शिरले. त्याचा अदमास घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. त्यामुळे प्रधान यांच्या राजीनाम्याचे श्रेय कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मिळाले. राहुल गांधींच्या हातातून ते श्रेय निसटून गेले. त्यामुळे राहुल गांधींनी न झालेल्या घटनेचे राजकीय भांडवल करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना “टार्गेट” केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये कुठेच कुणीही गोळीबार केला नाही. त्यामुळे अमित शहा यांनी गोळीबार करण्याचा आदेश देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण गोळीबार करण्याचा आदेश देण्याचे अधिकार मॅजिस्ट्रेटला असतात. कुठल्याही मंत्र्याला नसतात, असा स्पष्ट खुलासा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत केला.
– अमित शाह “टार्गेट” का??
पण राहुल गांधींनी तो खुलासा फेटाळून लावत इंदिरा भवन मधल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा अमित शहा यांना गोळीबाराच्याच मुद्द्यावर टार्गेट केले. कॉकरोच जनता पार्टीला आणि काँग्रेस सकट बाकीच्या विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधीच खऱ्या अर्थाने “टार्गेट” करता आले नाही, किंबहुना त्यांनी सातत्याने नरेंद्र मोदींना “टार्गेट” केल्याने मोदींचीच लोकप्रियता वाढली आणि त्याचा दुष्परिणाम काँग्रेस सकट बाकीच्या विरोधी पक्षांना भोगावा लागला. त्यामुळे राहुल गांधींनी आणि कॉक्रोच जनता पार्टीने आपले “टार्गेट” बदलून सुरुवातीला धर्मेंद्र प्रधान यांना जाळ्यात ओढले. प्रधानांच्या राजीनाम्याच्या यशामुळे विरोधकांच्या दंडात बेटकुळ्या शिरल्या आणि त्यातूनच राहुल गांधींनी अमित शाह यांना “टार्गेट” केले. त्यांचा राजीनामा हा “नॉन निगोशिएबल” असेल, असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले.
– काँग्रेस आणि कॉकरोच मधला विरोध
पण प्रत्यक्षात न झालेल्या गोळीबाराचा मुद्दा कॉक्रोच जनता पार्टीच्या हातात जाऊन विरोधकांचा राजकीय विचका होऊ नये म्हणूनच राहुल गांधींनी अमित शाह यांना “टार्गेट” करायचा डाव खेळला. यातून कॉक्रोच जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यातला परस्पर विरोध समोर आला.
Rahul Gandhi is unsettled because the ‘Cockroach Janata Party’ has claimed credit for Dharmendra Pradhan’s resignation; hence, Amit Shah is the “new target”!!
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटविला चुकीने, Meta ची माफी; पण इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाचे Meta ला समन्स!!
- PoK Assembly : पीओकेत निवडणुकीत हिंसाचार, गोळीबार; 1 ठार, अनेक जखमी, घोटाळ्याच्या आरोपांमुळे वाद वाढला
- धर्मेंद्र प्रधानांच्या खाते बदलाच्या बातम्या चुकीच्या; भाजपच्या प्रवक्त्यांचा अधिकृत खुलासा!!
- CJP आंदोलनातल्या हिंसाचाराच्या स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशीचे सुप्रीम कोर्टाचे आदेश!!; देशद्रोही घटकांना चाप!!