वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पेपर फुटीच्या प्रकरणावर कठोर कारवाई करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या अधिकृत अकाउंट वरून व्हिडिओ केला. पण Meta ने तो व्हिडिओ हटविला. त्यामुळे देशभर मोठ्या गोंधळ झाला. Meta ने व्हिडिओ हटविल्याबद्दल स्पष्टीकरण दिले तो व्हिडिओ चुकीने हटविल्याचा दावा केला.
– केंद्र सरकारने फेटाळले
पण Meta ने दिलेले स्पष्टीकरण केंद्र सरकारने फेटाळून लावले. या संदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन म्हणाले, “पंतप्रधानांच्या अधिकृत सोशल मीडिया हहँडलवरून अधिकृत मजकूर काढून टाकला जाणे ही अत्यंत चिंताजनक घटना आहे; असे मुळात घडायलाच नको होते. पण Meta ला या चुकीबद्दल माफी मागण्याची गरज वाटल्याचे मला समजले. या चुकीबद्दल त्यांनी बिनशर्त माफी मागितली हे चांगले झाले. पत तरीही, तांत्रिक कारण किंवा तांत्रिक बिघाडामुळे असे घडले, हे स्पष्टीकरण पूर्णपणे पटण्यासारखे वाटत नाही.
आम्ही त्याचे अधिक तपशील मागविले आहेत आणि अशा गोष्टी कशा घडतात?, यावर आम्ही सविस्तर तांत्रिक बैठक घेणार आहोत. भारतातील प्रमुख व्यक्तींची हँडल्स सुरक्षित (ringfenced) असावीत आणि एकदा का खाते ‘व्हेरिफाईड’ झाले की, त्यावर पोस्ट केलेला मजकूर अशा क्षुल्लक कारणांमुळे किंवा तांत्रिक चुकांमुळे काढून टाकला जाणार नाही, याची खात्री केली जावी; यासाठी आम्ही हमी मागणार आहोत. असे घडले ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आवश्यक त्या प्रणालीगत सुधारणा करायची आम्ही खात्री करू.”
पेपर फुटीच्या घटनांबाबत कठोर कारवाई करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या पोस्टच्या संदर्भात Meta ला समन्स बजावण्यात आले आहे का??, असे विचारले असता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन म्हणाले, “होय, आम्ही Meta ला बैठकीसाठी समंड केले आहे.”
PM Modi’s post on strict action over paper leaks removal, S. Krishnan, Secretary, Ministry of Electronics and Information Technology
महत्वाच्या बातम्या
- संसदेतली कोंडी संपायची उद्या शक्यता; परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलणार राहुल + प्रियांका!!
- Hormuz : होर्मुझमध्ये तेलवाहू जहाजाची सागरी सुरुंगाला धडक; जहाजाला आग, युद्ध सुरू झाल्यापासून पहिला अपघात
- Rajnath Singh : राजनाथ म्हणाले-भारत इनोव्हेशनचे मार्ग शोधत आहे, तर पाकिस्तान घुसखोरीचे; अडथळे निर्माण केल्यास सैन्य सज्ज
- माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचे संसदेत जोरदार स्वागत; विरोधकांना झोंबल्या मिरच्या!!