वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मोदी सरकारने परीक्षा सुधारणा विधेयक लोकसभेत मांडल्यावर दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी त्यावर भाषणे केली. यामध्ये खासदार प्रियांका गांधींचा देखील समावेश राहिला. त्यांनी अत्यंत तिखट शब्दांत मोदी सरकारवर शरसंधान साधले.
– प्रियांका गांधींचा आरोप
लोकसभेत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वद्रा म्हणाल्या, “पंतप्रधानांनी नवीन शिक्षणमंत्री म्हणून अशा व्यक्तीची नियुक्ती केली आहे, ज्यांनी एका गर्भवती महिलेवर बलात्कार करणाऱ्या दोषींच्या सुटकेवर संमती आणि आनंदही व्यक्त केला होता…” यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. दोन्ही बाजू एकमेकांना भिडल्या. शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी सभागृहात उपस्थित होते. त्यांनी प्रियांका गांधी यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला.
– संसदीय कामकाज मंत्र्यांचा आक्षेप
प्रियांका गांधी यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेताना संसदीय कामकाज मंत्री मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, “हे संसदेतील सदस्यांचे चारित्र्यहनन आहे आणि आम्हाला अशा भाषेची अपेक्षा नाही… ही विधाने कामकाजाच्या नोंदीतून वगळली पाहिजेत. दुसरे म्हणजे, अशी भाषा वापरली जाऊ नये… त्यांनी सभागृहाची माफी मागावी.”
– प्रियांका गांधींचे प्रत्युत्तर
खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी त्या आक्षेपांना प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, “एकीकडे ते महिलांचे हक्क आणि महिला आरक्षण आणत असल्याचे तसेच महिलांना आघाडीवर आणत असल्याचे सांगत आहेत… अशा वेळी हा अत्यंत चुकीचा संदेश जातो… पण मी नव्या शिक्षण मंत्र्यांनी त्यावेळी केलेल्या वक्तव्याची सत्यता सिद्ध करेन. त्यावेळचा एक व्हिडिओ उपलब्ध आहे. मी योग्य प्रक्रियेद्वारे सर्व काही सादर करेन.”
Priyanka Gandhi Vadra says, “At a time when they are saying that they are bringing in women’s rights, women’s reservations
महत्वाच्या बातम्या
- संसदेतली कोंडी संपायची उद्या शक्यता; परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलणार राहुल + प्रियांका!!
- Hormuz : होर्मुझमध्ये तेलवाहू जहाजाची सागरी सुरुंगाला धडक; जहाजाला आग, युद्ध सुरू झाल्यापासून पहिला अपघात
- Rajnath Singh : राजनाथ म्हणाले-भारत इनोव्हेशनचे मार्ग शोधत आहे, तर पाकिस्तान घुसखोरीचे; अडथळे निर्माण केल्यास सैन्य सज्ज
- माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचे संसदेत जोरदार स्वागत; विरोधकांना झोंबल्या मिरच्या!!