वृत्तसंस्था
इस्लामाबाद : PoK Assembly पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान सोमवारी हिंसक चकमकी झाल्या. गोळीबाराच्या घटनांमध्ये किमान एकाचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले. राजकीय पक्षांनी एकमेकांवर निवडणुकीत गोंधळ घालण्याचा व हिंसाचार भडकवल्याचा आरोप केला आहे.PoK Assembly
पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) दावा केला की, त्यांचा कार्यकर्ता मुख्तार युनूस याचा पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) समर्थकांच्या गोळीबारात मृत्यू झाला आणि इतर दोन कार्यकर्ते जखमी झाले. पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत निवडणूक आयोग आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ४५ निवडलेल्या आणि आठ राखीव जागा असलेल्या ५३ सदस्यांच्या विधानसभेसाठी २७ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान तीन टप्प्यांत निवडणुका होत आहेत. पीपीपी आणि पीएमएल-एन यांनी अनेक मतदारसंघांत एकमेकांवर मतदानात गोंधळ घातल्याचे आरोप केले आहेत.PoK Assembly
हा दडपशाहीविरोधात संताप
पीओकेतील संकट प्रशासकीय अपयशासोबतच पाकिस्तानी राजवटीच्या प्रदीर्घ दडपशाही आणि शोषणाविरोधात स्थानिक जनतेचा उत्स्फूर्त संताप आहे. प्रशासनाने बळजबरी आणि दडपशाहीचे धोरण सुरू ठेवल्यास निवडणूक बाधित होऊन व्यवस्था पूर्णपणे कोलमडू शकते, असे तज्ज्ञांचेही मत आहे.
मुझफ्फराबादच्या दिशेने कूच…
निवडणुकीत संयुक्त अवामी ॲक्शन कमिटी व प्रशासन यांच्यातील चर्चा अपयशी ठरली. त्यानंतर हजारो निदर्शकांनी मुझफ्फराबादच्या दिशेने कूच केले. हा मोर्चा ५२ दिवसांपासून सुरू आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काढला.
पीटीआयचा निवडणुकीवर बहिष्कार
इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. गेल्या महिन्यात जेएएसीच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, असा दावा पीटीआयने केला आहे.
PoK Assembly Election Violence: One Killed, Several Injured in Firing
महत्वाच्या बातम्या
- संसदेतली कोंडी संपायची उद्या शक्यता; परीक्षा सुधारणा विधेयकावर बोलणार राहुल + प्रियांका!!
- Hormuz : होर्मुझमध्ये तेलवाहू जहाजाची सागरी सुरुंगाला धडक; जहाजाला आग, युद्ध सुरू झाल्यापासून पहिला अपघात
- Rajnath Singh : राजनाथ म्हणाले-भारत इनोव्हेशनचे मार्ग शोधत आहे, तर पाकिस्तान घुसखोरीचे; अडथळे निर्माण केल्यास सैन्य सज्ज
- माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचे संसदेत जोरदार स्वागत; विरोधकांना झोंबल्या मिरच्या!!