मास्क घालून जेवणारा पहिला माणूस, सोशल मीडियावर राहूल गांधी यांची उडविली जातेय खिल्ली


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: जेवण्याच्या टेबलवर मास्क घातलेला कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मास्क घालून जेवणारा पहिला माणूस असे म्हणत त्यांची खिल्ली उडविली जात आहे.Rahul Gandhi is being ridiculed on social media as the first person to wear a mask while eating

भारतीय जनता पक्षाचे हरियाणा आयटी प्रमुख अरुण यादव यांनी मास्क घालून जेवणारा पहिला माणूस या मथळ्यासह हा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्टला नऊ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आणि दोन हजारांवर लोकांनी ही इमेज रट्विट केली. त्यानंतर सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होऊ लागला.



अनुकरण करण्यासाठी सुध्दा बुध्दीमत्ता आवश्यक आहे, असेही म्हटले गेले. एकाने तर लिहिले की मास्क लावून जेवणारा पहिला माणूस. पप्पू नीट वागूही शकत नाही, आणि त्याला योगी (उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ) आणि मोदीजी यांच्याविरुद्ध लढायचे आहे.

हा फोटो गेल्या वर्षीचा २५ जानेवारीचा आहे. तामीळनाडू कॉंग्रेसने पोस्ट करून याबाबत खुलासा केला आहे. या कार्यक्रमातीलच फोटो असला तरी जेव्हा राहूल गांधी यांनी जेवायला सुरूवात केली तेव्हा त्यांनी मास्क काढला होता. तामिळनाडूच्या तीन दिवसीय दौºयादरम्यान इरोड जिल्ह्यातील ओडानिलाई येथे विणकरांसोबत जेवताना घेण्यात आला होता.

Rahul Gandhi is being ridiculed on social media as the first person to wear a mask while eating

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात