• Download App
    आसाममध्ये बहुविवाहावर बंदी येणार, तज्ज्ञ समितीने सादर केला अहवाल ; मुख्यमंत्री हिमंता म्हणाले…Polygamy to be banned in Assam expert committee submits report Chief Minister Himanta said...

    आसाममध्ये बहुविवाहावर बंदी येणार, तज्ज्ञ समितीने सादर केला अहवाल ; मुख्यमंत्री हिमंता म्हणाले…

    बहुपत्नीत्व संपुष्टात आणण्यासाठी विधानसभेची विधान क्षमता तपासण्यासा समिती स्थापन केली गेली होती.

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी : आसामच्या हिमंता बिस्वा सरमा सरकारने बहुपत्नीत्व संपुष्टात आणण्यासाठी एक नवीन पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी या वर्षीच हा कायदा लागू केला जाईल, असे सांगितले आहे. आसाम सरकारने राज्यातील बहुपत्नीत्व संपुष्टात आणण्यासाठी विधानसभेची विधान क्षमता तपासण्यासाठी एक समिती स्थापन केली. या समितीने 6 ऑगस्ट, रविवारी आपला अहवाल सादर केला आहे. Polygamy to be banned in Assam expert committee submits report Chief Minister Himanta said…

    बहुपत्नीत्व रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीने आपला अहवाल आसाम सरकारला सादर केला आहे. परंतु, तो अद्याप सार्वजनिक केला गेला नाही. शिवाय आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    आसामचे मुख्यमंत्री म्हणाले, “तज्ञ समितीने आज आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. या आर्थिक वर्षात कायदा लागू होईल. आम्ही तो वाचून त्यावर चर्चा करण्यासाठी आमदारांना वेळ देऊ इच्छितो. समितीने आपल्या अहवालात असे म्हटले आहे. की, हा कायदा करण्यास राज्य सरकार सक्षम आहे.” तसेच, ते म्हणाले की, आसाम जात, पंथ किंवा धर्माची पर्वा न करता महिलांच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याच्या जवळ पोहचले आहे.

    Polygamy to be banned in Assam expert committee submits report Chief Minister Himanta said…

     

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार