वृत्तसंस्था
लखनौ – लोकप्रिय शायर मुनव्वर राणा यांनी आपली (अ)शायरी प्रकट केली आहे. सातत्याने वादग्रस्त आणि जातीयवादी विधाने करणाऱ्या मुनव्वर राणांनी नवीन अंदाज ए (अ)शायरी केली आहे, की असदुद्दीन ओवैसींच्या मदतीने जर योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले, तर मी उत्तर प्रदेश सोडून निघून जाईन. poet munnavar rana opposed two child policy of yogi govt in UP
मुनव्वर राणा एवढेच विधान करून थांबलेले नाहीत. तर त्यांनी उत्तर प्रदेश हे राज्य मुसलमानांच्या राहण्यासाठी योग्य राहिलेले नाही. मुसलमान ८ – ८ मुले जन्माला घालतात कारण त्यांना भीती वाटते, की त्यांची किमान दोन मुले दहशतवादी म्हणून मारली जातील, अशी पुरोगामी मुक्ताफळे देखील मुनव्वर राणांनी उधळली आहेत.
मुनव्वर राणा का फिर भड़काउ बयान, “मुसलमानों! तुम्हें ओवैसी की जीत और बिहार की हार मुबारक हो”
लोकसंख्या नियंत्रणासंदर्भातील योगी आणू इच्छित असलेल्या टू चाइल्ट पॉलिसीसंदर्भात मुन्नवर राणा यांनी एका मुलाखतीत बेछूट मत नोंदविले आहे. लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या बाता मारणाऱ्या योगी सरकारला मला हे सांगायचे आहे की मुसलमान आठ मुले यासाठी जन्माला घालतात कारण त्यांना भीती असते की त्यांची दोन मुले दहशतवादी म्हणून मारली जाऊ शकतात. दोघे कोरोनाने मरू शकतात. अशावेळी आई-बापाची पार्थिव स्मशानभूमीपर्यंत पोहचवायला कोणीतरी हवे ना?”, असा पुरोगामी टोला राणा यांनी लगावला आहे.
मुनव्वर राणा हे पुरोगामी शायर म्हणून ओळखले जातात. तरी त्यांनी लोकसंख्या नियंत्रण धोरणाला विरोध केला आहे. योगींचे धोरण मुसलमान विरोधी असल्याचा दावा मुनव्वर राणा यांनी केला आहे.
ते म्हणाले, की ज्या दोन मुलांना दहशतवादी म्हणून अटक करण्यात आली ते दोघे इतके गरीब आहेत. ते जगण्यासाठी संघर्ष करताहेत. त्यांना अल कायदाशी संबंधित असल्याचा ठपका ठेवला आहे आणि प्रेशर कुकरला बॉम्ब सांगून त्यांना पकडले आहे. मी सुद्धा यापूर्वी कार्यक्रमासाठी पाकिस्तानला जायचो. काही दिवसांपूर्वी मी प्रेशर कुकर विकत घेतला आहे. मग दहशतवादी विरोधी पथक मला पण दहशतवादी समजून अटक करणार का?, अशी पुरोगामी मुक्ताफळे राणांनी उधळली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App