तरुण तेजपालचा इनकॅमेरासाठीचा अर्ज खंडपीठाने फेटाळला


विशेष प्रतिनिधी

पणजी – सहकारी तरुणीवरील कथित बलात्काराच्या आरोपातून निर्दोष सुटलेल्या तरुण तेजपाल याच्याविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेल्या आव्हान याचिकेत ही सुनावणी ‘इनकॅमेरा’ घेण्यासाठी केलेला अर्ज आज दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळला.Pition of Tarun Tejpal rejected

आव्हानाला विरोध केलेल्या अर्जावरील सुनावणी येत्या सहा डिसेंबरला ठेवण्यात आली आहे.तेजपाल याच्यातर्फे वकिलांनी बाजू मांडताना ही सुनावणी बलात्काराच्या आरोपासंदर्भात असल्याने ती ‘इनकॅमेरा’ व्हावी, जर हा अर्ज फेटाळण्यात आला तर सर्वोच्च न्यायालया आव्हान दिले जावे अशी सूचना अशिलाने केली आहे.त्यामुळे खंडपीठाने या अर्जावर सुनावणी घेऊन निर्णय द्यावा अशी विनंती वकीलांनी केली.सरकारतर्फे बाजू मांडणाऱ्या वकिलांनी त्यास विरोध केला. आव्हान याचिकेवरील सुनावणीसाठी ‘इनकॅमेरा’ आवश्योकता नाही असे त्यांनी खंडपीठाला सांगितले. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर अर्ज फेटाळण्यात

आला व तेजपालच्या दुसऱ्या अर्जावर बाजू मांडण्याची सूचना खंडपीठाने केली असता ती पुढे ढकलण्याची विनंती वकिलांनी यावेळी केली.सात आणि आठ नोव्हेंबर २०१३ रोजी गोव्यातील एका तारांकित हॉटेलमध्ये ‘थिंक फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तेजपाल याने लिफ्टमध्ये बलात्कार केल्याचा आरोप सहकारी तरुणीने केला होता.

Pition of Tarun Tejpal rejected

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात