वृत्तसंस्था
बालासोर : ओडिशातील बालासोर येथे आतापर्यंत झालेल्या सर्वात भीषण अपघातात 288 निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून या रेल्वे अपघाताचे सर्व बाजूंनी कसून चौकशी आणि तपासाचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांना कठोरात कठोर सजा दिली जाईल, असा स्पष्ट निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला आहे.Odisha Railway Accident or Casualty??; Orders for thorough investigation, severe punishment for the guilty; Nirwala of the Prime Minister
बालासोर मध्ये प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंतप्रधान मोदींनी तिथली पाहणी करून मदत आणि बचाव कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पंतप्रधानांनी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये जाऊन जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. त्या सर्वांना संपूर्ण बरे होईपर्यंत सरकारी मदतीचे आश्वासन दिले.
#WATCH जिन लोगों ने अपना जीवन खोया है ये बहुत दर्दनाक था। जो लोग घायल हुए हैं सरकार उनके उत्तम स्वास्थ्य के लिए कोई कसर नहीं छोड़ेगी। यह एक गंभीर घटना है। हर प्रकार की जांच करने के निर्देश दिए गए हैं। जो दोषी पाया जाएगा उसे सख्त से सख्त सजा दी जाएगी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी… pic.twitter.com/LzTmCJyvRL — ANI_HindiNews (@AHindinews) June 3, 2023
#WATCH जिन लोगों ने अपना जीवन खोया है ये बहुत दर्दनाक था। जो लोग घायल हुए हैं सरकार उनके उत्तम स्वास्थ्य के लिए कोई कसर नहीं छोड़ेगी। यह एक गंभीर घटना है। हर प्रकार की जांच करने के निर्देश दिए गए हैं। जो दोषी पाया जाएगा उसे सख्त से सख्त सजा दी जाएगी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी… pic.twitter.com/LzTmCJyvRL
— ANI_HindiNews (@AHindinews) June 3, 2023
त्यानंतर दूरदर्शनशी बोलताना पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले, की बालासोर रेल्वे दुर्घटना अत्यंत गंभीर आहे. सरकारने त्याची पूर्ण दखल घेऊन भविष्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नेमका कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील?, याची पूर्ण चाचपणी केली आहे. या दुर्घटनेने सरकारला खूप काही शिकवले आहे. पण त्याचबरोबर या रेल्वे दुर्घटनेची सर्व बाजूंनी चौकशी आणि तपास करण्याचे आदेश दिले आहेत. यात जे कोणी दोषी आढळतील, त्यांना कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, कोणालाही जबाबदारीतून निसटून जाता येणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App