केवळ मणिपूरच नाही तर अनेक मुद्द्यांवरून विरोधकांनी आतापर्यंत संसदेत चर्चेपासून काढला आहे पळ!

parliament monsoon session should be extended to make up for lost time says rjd leader manoj jha

 भाजपाने तपशीलाच्या आधारे काँग्रेसचा केला पर्दाफाश

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधक पावसाळी अधिवेशनात मागील दोन दिवसांपासून सातत्याने संसदेत गदारोळ घालत आहेत. सत्ताधारी भाजपाकडून वारंवार चर्चेसाठी आवाहन करूनही विरोधक चर्चेपासून पळ काढताना दिसत आहे. त्यामुळे भाजपाने आता विरोधकांवर पलटवार केला आहे. Not only Manipur the opposition has not discussed many issues in the Parliament till now

याबाबत भाजपाने विरोधकांवर अनेक आरोप केले आहेत. भाजपचे म्हणणे आहे की, विरोधक मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत विरोधक कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार नसण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे भाजपाने आकडेवारीच्या माध्यमातून सांगितले आहे. यापूर्वीही असे अनेक मुद्दे समोर आले होते, तेव्हा विरोधकांनी चर्चा करण्याऐवजी गदारोळ करणे योग्य समजले होते.

काँग्रेसने कितीवेळा चर्चेपासून पळ काढला? –

भाजपाने म्हटले आहे की- ‘संसदेचे अधिवेशन सुरू होताच काँग्रेस गोंधळ सुरू करते, कोणीही चर्चा करत नाही. सभागृहाचे कामकाज होऊ देत नाही, आणि मग सत्ताधारी चर्चेपासून पळ काढत असल्याचा उलटा आरोप केला जातो.

‘या घटना काँग्रेसच्या पॅटर्नचे उदाहरण आहेत’

जुलै २०२३: मणिपूर हिंसाचार घटनेवर सभागृहाचे कामकाज चालू दिले जात नाही, पण त्यावर चर्चाही करत नाही.

जुलै २०२२: महागाईच्या मुद्य्यावर सभागृह चालू दिले नाही, चर्चाही केली नाही

जुलै २०२१: ‘पेगासस’ला मुद्दा बनवून सभागृहाचे कामकाज थांबवले, पण चर्चा केली नाही.

मार्च २०२०: दिल्ली हिंसाचारावर सतत गदारोळ, पण चर्चा केली नाही.

Not only Manipur the opposition has not discussed many issues in the Parliament till now

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात