नूह हिंसाचार करणाऱ्यांनी पोलिसांवर केला गोळीबार , CIAने चकमकीनंतर दोन आरोपींना केली अटक

नूहपासून 16 किमी अंतरावर असलेल्या तावडूमध्ये ही चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष प्रतिनिधी

नूह : हरियाणातील  नूह येथे 31 जुलै रोजी झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकार संपूर्ण कारवाईत आहे. प्रथम, बुलडोझरने कारवाई करून हिंसाचारातील तथाकथित आरोपींची घरे सरकारने उद्ध्वस्त केली. आता हरियाणा पोलिसांनी नवीन कारवाई सुरू केली आहे. हिंसाचारानंतर सुमारे एक आठवड्यानंतर, हरियाणा पोलिसांनी एन्काउंटर केले आहे, ज्यामध्ये पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. Noah Violators Fire On  Police CIA Arrests Two Accused After Encounter

नूहपासून 16 किमी अंतरावर असलेल्या तावडूमध्ये ही चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे. हरियाणा पोलिसांना 31 जुलै रोजी नूह हिंसाचारात सहभागी असलेले दोन कथित दंगेखोर राजस्थानमार्गे तावडू मार्गे नूह येथे येत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी दोघांनाही तावडूच्या डोंगराळ भागात रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तराची कारवाई केली.

आरोपी आणि पोलिसांमध्ये बराच वेळ गोळीबार झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. अखेर पोलिसांनी चकमकीत एका आरोपीला जखमी केले. आरोपीच्या पायाला गोळी लागल्याने तो तिथेच पडला, त्याला पोलिसांनी नंतर अटक केली. या वेळी दुसरा आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्तर री तोही पकडला गेला.

31 जुलै रोजी नूह येथे हिंदू पक्षाकडून ब्रज मंडळ यात्रा काढण्यात आली होती. यात्रेची सांगता नल्हार गावातील नल्हारेश्वर मंदिरात होणार होती. यात्रा मंदिराकडे जात असताना अचानक दगडफेक सुरू झाली. काही हल्लेखोरांनी यात्रेवर दगडफेक केली, ज्यामुळे हिंदू बाजूही संतप्त झाली.

Noah Violators Fire On  Police CIA Arrests Two Accused After Encounter

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात