• Download App
    कोरोनाच्या नव्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका असल्याची माहिती चुकीची -गुलेरिया |No tension for children in third wave

    कोरोनाच्या नव्या लाटेत मुलांना सर्वाधिक धोका असल्याची माहिती चुकीची -गुलेरिया

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – कोरोनाच्या येणाऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना होणार असल्याची माहिती चुकीची आहे. भारतच नव्हे; जगभरातही मुलांना धोका होण्यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केली.No tension for children in third wave

    ते म्हणाले, “कोरोनाचा संसर्ग ज्या मुलांना झाला आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, त्यातील ६० ते ७० टक्के मुलांना सहव्याधी होत्या. त्यांची प्रतिकार क्षमता देखील कमी होती. कोरोना प्रतिबंधक नियमांचे कसोशीने पालन यामुळेच कोरोनाला रोखता येणार आहे.’’



    संसर्गाचे प्रमाण कमी होते, व्यवहार सुरू होतात, त्यावेळी कोरोना विषयक नियमांचे पालन केले जात नाही. आता संसर्ग होणार नाही, असा लोकांचा समज होतो. लोक नियम पाळत नाही आणि पुन्हा संसर्गाचे प्रमाण वाढते.

    बहुसंख्य लोकसंख्येचे लसीकरण झाले आणि प्रतिकारक्षमता वाढली की अशा लाटा थांबतील, असे गुलेरिया म्हणाले.

    No tension for children in third wave

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CBSE : CBSE चा निर्णय, तिसऱ्या भाषेत बोर्ड परीक्षा होणार नाही; त्रि-भाषा धोरणासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

    President Droupadi Murmu : राष्ट्रपती भवनात शौर्य पुरस्कार सोहळा; मुर्मू यांनी लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग यांना अति विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित केले

    New Delhi EV Policy : दिल्लीत ईव्हीवर रोड टॅक्स-नोंदणी मोफत; ₹30 लाखांपर्यंतच्या गाड्यांवर सूट; 2028 पासून पेट्रोल-सीएनजी टू-व्हीलर्स बंद होतील