पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी केले तेवढे काम कोणत्याही शेतकरी नेत्यानेही केले नाही, जे. पी. नड्डा यांनी सुनावले

विशेष प्रतिनिधी

गोरखपूर : पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी केले तेवढे काम कोणत्याही शेतकरी नेत्यानेही केले नाही. सबका साथ, सबका विश्वास हे भाजपचे ब्रिद आहे. भाजप सांस्कृतिक राष्ट्रवाद मानते तर विरोधक केवळ वंशवाद मानतात, अशा शब्दांत भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विरोधकांना सुनावले.No farmer leader has done as much work as Prime Minister Modi did for the farmers. P. Narrated by Nadda

गोरखपूर येथे बुथ अध्यक्षांच्या अधिवेशनात बोलताना नड्डा म्हणाले, विरोधकांचा लोकशाहीवर नव्हे तर कौटुंबिक राजवटीवर विश्वास आहे. आम्ही सांस्कृतिक राष्ट्रवाद मानतो आणि विरोधक वंशवाद. आमच्यासाठी राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे आणि त्यांच्यासाठी वंशवाद हेच सर्वस्व आहे.



नड्डा म्हणाले, मी एका विरोधी पक्षाच्या नेत्याला विचारले की, ते फक्त एका कुटुंबासाठी उभे राहतात तेव्हा त्यांचा विवेक दुखावला जात नाही का? तुम्ही फक्त एकाच कुटुंबासाठी टाळ्या वाजवण्याचा ‘ठेका’ घेतला आहे . त्यांना याचे उत्तर देता आले नाही. भाजप मात्र, सबका साथ, सबका विश्वास हे ब्रीदवाक्य घेऊन सर्वांना सोबत घेऊन जात आहे.

विरोधक व्होट बँकेचे राजकारण करतात. केवळ विशिष्ठ समाज आणि कुटुंबाची चिंता करतात. आम्ही प्रत्येकाच्या प्रगतीचा विचार करतो. ते त्यांच्या भावाचा आणि काकाचा विचार करतात. आता त्यांनी काकांबद्दलही विचार करणे सोडून दिले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की हे तेच राज्य आहे जिथे पूर्वीच्या सरकारच्या काळात माफिया आणि दंगलखोरांचे वर्चस्व होते. परंतु आता गुंडच गुंडगिरी विसरले आहेत. उत्तर प्रदेशात आता कायद्याचे राज्य आहे. माफिया राज्य सोडून गेले आहेत.

कारण त्यांना माहित आहे की त्यांनी गडबड केल्यास वसुली केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला सक्षम बनवण्यात आणि त्याचा अभिमान आणि वैभव जपण्यात गुंतले आहेत. मात्र जिनावादी लोकांचे हक्क लुटत आहेत.

No farmer leader has done as much work as Prime Minister Modi did for the farmers. P. Narrated by Nadda

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात