• Download App
    पहिल्या पावसात मुंबई भिजली, मुख्यमंत्री उतरले जलमय रस्त्यावर!!|Mumbai got soaked in the first rain, the Chief Minister came down to the waterlogged streets!!

    पहिल्या पावसात मुंबई भिजली, मुख्यमंत्री उतरले जलमय रस्त्यावर!!

    प्रतिनिधी

    मुंबई : पहिल्या पावसात मुंबई भिजली आणि जलमय झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांच्या सोयीसाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.Mumbai got soaked in the first rain, the Chief Minister came down to the waterlogged streets!!

    आज सकाळी मुंबई उपनगरातील मिलन सब वे ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. सध्या या भागात पाणी साचलेले नाही, पावसाचे साठलेले पाणी टॅंकरमध्ये जमा करण्यासाठी स्टोरेज टॅंक ठेवलेल्या आहेत. या भागात पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.



    त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी वरळी येथील कोस्टल रोड येथे हजर राहून पाणी साचण्याची कारणे जाणून घेतली. तसेच येथील परिस्थितीचा आढावा घेतला. या भागात पाणी साचू नये याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. आज जरी याठिकाणी पाणी नसले तरीही काल मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसामुळे इथे पाणी साचून हा परिसर जलमय झाल्यामुळे येथे अनेक वाहने अडकून पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे याठिकाणी भेट देऊन येथील परिस्थिती जाणून घेतली.

    Mumbai got soaked in the first rain, the Chief Minister came down to the waterlogged streets!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Dr. Manmohan Singh : माजी CEC चा दावा, मनमोहन म्हणाले होते- मी आत्महत्या करेन; कुरेशी म्हणाले– माजी पीएमचे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झालो होतो

    उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल

    Delayed Monsoon : देशात शेती असलेल्या भागात दुष्काळाचे सावट; निम्म्या भारतात तुटीच्या पावसाने खरीप पेरण्या 21% पिछाडीवर, महाराष्ट्रावरही चिंतेचे ढग