विशेष प्रतिनिधी
धुळे : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एकाच वेळी ८ वाहने धडकून चर जणांचा मृत्यू झाला आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील बिजासनी घाटात हा अपघाताचा थरार घडला. यात अंदाजे तीन ते चार जणांचा मृत्यू तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. Mumbai-Agra highway crash, eight vehicles collided in Bijasani Ghat; Four people were killed
शिरपूर तालुक्यातील पळासनेर परिसरात मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. बुधवारी रात्री ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश सेंधवाकडून शिरपूरकडे येतत असतांना ओव्हरटेकच्या नादात अपघात घडल्याची माहिती प्राप्त होत आहे.
एकामागून एक धावणाऱ्या ८ वाहनांनी मागून धडक दिली. यात तिन ते चारचार वाहनांचा तर काही ट्रकचा समावेश आहे. या घटनेत चारचाकींचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी मदतकार्य सुरु केले असून रुग्णवाहिका व पोलीस यंत्रणा देखील धावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App