हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील जवाहर कारखान्याकडून शेतकऱ्याच्या ऊस बिलातून थकीत विजबिलाची वसुली करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. असे करणे बेकायदेशीर असल्याचे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महावितरण आणि ठाकरे सरकारला घेरलं आहे.MSEDCL and Thackeray governments pathani recovery continues, Fadnavis attack on electricity bill collection from sugarcane bill Of A farmer in Kolhapur
वृत्तसंस्था
पणजी : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील जवाहर कारखान्याकडून शेतकऱ्याच्या ऊस बिलातून थकीत विजबिलाची वसुली करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. असे करणे बेकायदेशीर असल्याचे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महावितरण आणि ठाकरे सरकारला घेरलं आहे.
फडणवीस म्हणाले की, हे अतिशय चुकीचं आहे. महाराष्ट्राचं वीज मंडळ हे सावकारी झालं आहे आणि महाराष्ट्राचं सरकार हे पठाणी वसुली करतंय. ही वसुली करून शेतकऱ्याला नागवण्याचा हा प्रयत्न आहे. त्याच्या पैशातनं त्याने नियोजन केलेलं असतं, घरातल्या सणासुदीचं, लग्नाचं, मुलांच्या शिक्षणाचं आणि त्यातून अशी वाटमारी करणं अतिशय चुकीचं आहे, ही पद्धत तत्काळ बंद झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्याच्या ऊसबिलातून परस्पर वसुली
अभिजीत कलगोंडा पाटील यांना मिळालेल्या ऊसबिलाच्या पावतीवर महावितरणची थकीत बाकी तीन हजार रुपये कारखान्याने ऊस बिलातून परस्पर वळती केल्याचे स्पष्टपणे छापून आले आहे. या प्रकारानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.
राजू शेट्टींचा आंदोलनाचा इशारा
राजू शेट्टी म्हणाले की, जी वीज आम्ही वापरत नाहीत, त्याची बिलं आलेली आहेत, यासाठी दोन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. बिलं दुरुस्त करून द्या, आम्ही भरायला तयार आहोत, असं आम्ही वारंवार सांगितलं आहे. ज्या ज्या वेळी बिलं दुरुस्त करून देण्यात आली, त्या त्या वेळी शेतकऱ्यांनी ती भरली आहेत. असं असताना सदोष बिलाच्या रकमेपोटी साखर कारखान्यातून परस्पर रक्कम महावितरणला वळती करण्याचा प्रकार सुरू आहे.
असं करणं हे बेकायदेशीर आहे. शेतकऱ्याच्या संमतीशिवाय कुणीही त्याच्या ऊस बिलाची रक्कम वळती करू शकत नाही. कायद्यानं हा गुन्हा आहे. यामुळे महावितरण कंपनी आणि कारखान्याच्या चेअरमनविरोधात आम्ही आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा नोंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App