तेलंगणात मतदानापूर्वी सापडले पैशांचे घबाड; बेहिशेबी रक्कम कारमधून जप्त, 5 राज्यांतून आतापर्यंत 1760 कोटी जप्त

वृत्तसंस्था

हैदराबाद : तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, गुरुवारी निवडणूक प्रचारादरम्यान पोलिसांनी रंगारेड्डी येथील गचीबोवली येथे एका कारमधून 5 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. या रोख रकमेबाबत कार चालकाला विचारणा केली असता ते या रोख रकमेचा कोणताही हिशेब देऊ शकले नाहीत. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.Money hoard found before polls in Telangana; Unaccounted amount seized from cars, 1760 crore seized from 5 states so far

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन तपासणीदरम्यान एका कारमध्ये दोन सुटकेस आढळून आल्या. त्या उघडून पाहिल्यावर पोलिसांना धक्काच बसला. पोलिसांनी रोख रक्कम जप्त करून तिघांनाही ताब्यात घेतले. ही रोकड आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.



https://x.com/ANI/status/1727737517494178034?s=20

5 राज्यांमध्ये आतापर्यंत 1760 कोटी रुपये जप्त

यापूर्वी निवडणूक आयोगाने सांगितले होते की, 5 राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्यापासून सुमारे 1760 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. 2018 मध्ये या 5 राज्यांमधून मिळालेल्या रोख रकमेपेक्षा हे प्रमाण 7 पट अधिक आहे. निवडणूक आयोग राज्य आणि केंद्रीय एजन्सींच्या सहकार्याने अशा कारवाया करतो. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या घोषणेनंतर मध्यप्रदेश, मिझोराम, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थानमधून 1760 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर 2018 मध्ये या राज्यांमधून 239.15 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते.

यापूर्वी निवडणूक आयोगाने गुजरात, हिमाचल, नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटकमध्ये 1400 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली होती. गेल्या निवडणुकीत जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेच्या 11 पट हे प्रमाण आहे.

Money hoard found before polls in Telangana; Unaccounted amount seized from cars, 1760 crore seized from 5 states so far

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात