विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऊस उत्पादक शेतकरी ऊसाला भाव मिळविण्यासाठी संघर्ष करत असताना मोदी सरकारने त्यांना भेट दिली आहे. इथेनॉलच्या किंमती 80 पैशांपासून ते 2.55 रुपये प्रति लिटरने वाढविल्या आहेत.Modi government’s gift to sugarcane growers, increase in ethanol prices
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय आर्थिक व्यवहार समितीने शेतकºयांचे उत्पन्न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा होण्यासाठी इथेनॉलच्या किमती 80 पैशांपासून ते 2.55 रुपये प्रति लिटरने वाढवल्यात. त्यामुळे उसावर आधारित इथेनॉलची किंमत 62.65 रुपयांवरून 63.45 रुपये प्रतिलिटर होणार आहे. इथेनॉलच्या नवीन किमती 1 डिसेंबर 2021 पासून लागू होतील, असंही केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले.
ठाकूर म्हणाले की, बी श्रेणीच्या सेरामधून मिळणाऱ्या इथेनॉलची किंमत सध्या 57.61 रुपये प्रति लिटरवरून 2.55 रुपयांनी वाढवून 59.08 रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. त्याचवेळी सी श्रेणीच्या सेरामधील इथेनॉलची किंमत 44.54 रुपयांवरून 2.12 रुपयांनी वाढवून 46.66 रुपये प्रति लिटर करण्यात आली. यापूर्वी आॅक्टोबर 2020 मध्ये केंद्र सरकारने उसापासून काढलेल्या इथेनॉलच्या किमतीत प्रतिलिटर 3.34 रुपयांनी वाढ केली होती.
अनुराग ठाकूर म्हणाले की, इथेनॉलच्या किमती वाढल्याचा थेट फायदा देशातील 12 राज्यांतील शेतकºयांना मिळणार आहे. उसाच्या कडब्यापासून बनवलेल्या इथेनॉलची किंमत डिसेंबर 2020 पासून सुरू होणाºया पुरवठा वर्षात 59.48 रुपये प्रति लिटरवरून आता 62.65 रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. मोदी सरकारने कच्च्या तेलाची आयात कमी करण्याची योजना आखली आहे. या अंतर्गत वाहनाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणाचा प्रचार केला जात आहे. या अंतर्गत सरकारने 10 टक्के इथेनॉलच्या मिश्रणाला मान्यता दिली आहे.
केंद्र सरकारने म्हटले आहे की, इथेनॉलच्या किमती वाढवून ऊस उत्पादक शेतकºयांना त्यांच्या पिकांना चांगला भाव मिळू शकेल. सरकार 10% इथेनॉल मिश्रित पेट्रोल विकणाºया भागात इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोल प्रोग्राम लागू करत आहे. सरकारने 1 एप्रिल 2019 पासून देशभरात हा कार्यक्रम लागू केला आहे. सरकार जून 2021 पासून 20 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या योजनेवर काम करत आहे, ज्याची अंमलबजावणी एप्रिल 2025 पासून करण्याचे लक्ष्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App