विशेष प्रतिनिधी
नाशिक : पश्चिम बंगाल मध्ये आज शुभेच्छा अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या समारंभात एक वैशिष्ट्यपूर्ण घटना घडली. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याबरोबर काम केलेल्या वयोवृद्ध नेते माखनलाल सरकार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्कार केला.Modi felicitates Makhanlal Sarkar, who worked with Shyama Prasad Mukherjee, at the swearing-in ceremony of Shubendu Adhikari!!
जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जन्मभूमी असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार पहिल्यांदा आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. याचेच प्रतिक म्हणून त्यांनी शपथविधी समारंभाचे औचित्य साधून माखनलाल सहकार यांचा सत्कार केला.
– श्यामाप्रसादांबरोबर काम
माखनलाल सरकार यांनी शामाप्रसाद मुखर्जी यांच्याबरोबर सुरुवातीपासून काम केले. ते मुखर्जींबरोबर जम्मू-काश्मीरच्या आंदोलनात सहभागी झाले. याच आंदोलनादरम्यान त्यांना पंजाब मध्ये अटक झाली होती त्यांनी तिथे तुरुंगवास सुद्धा भोगला होता. माखनलाल सरकार यांनी पश्चिम बंगालच्या प्रतिकूल राजकीय परिस्थिती सुद्धा जनसंघ आणि भाजप यांची साथ कधी सोडली नाही. ते सातत्याने पश्चिम बंगाल मध्ये काम करत राहिले. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करून माखनलाल सरकार यांच्या सत्कार केला. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या शपथविधी समारंभाचे हे सगळ्यांत मोठे वैशिष्ट्य ठरले.
Modi felicitates Makhanlal Sarkar, who worked with Shyama Prasad Mukherjee, at the swearing-in ceremony of Shubendu Adhikari!!
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची संख्या वाढून 37 होईल; मंत्रिमंडळाची प्रस्तावाला मंजुरी, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक
- जंग जंग पछाडले, पद काही मिळेना; पण स्वतःच्या तोंडून महत्त्वाकांक्षा जाहीर करायची हौस काही फिटेना!!
- दीदी, आप हारी नही, म्हणून अखिलेश यादवांकडून ममतांचा हिरवी शाल घालून सत्कार; पुढच्या राजकारणाची चाहूल!!
- Supreme Court : सबरीमाला केस, सुप्रीम कोर्ट म्हणाले- वारंवार भूमिका बदलू शकत नाही; बोहरा समाजातील धार्मिक