Article 370 : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याच्या जल्लोषामुळे मेहबूबा मुफ्तींचा संताप!

after farooq abdullah now mehbooba mufti commented on taliban

मेहबूबा यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.

विशेष प्रतिनिधी

जम्मू-काश्मीर : आज देशभरात विशेषकरून जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्याच्या ऐतिहासिक निर्णयास चार वर्षे झाल्यानिमित्त अनेक ठिकाणी नागरिकांकडून जल्लोष करण्यात आला. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासोबतच खबरदारीचा उपाय म्हणून काही नेत्यांना नजरकैदेतही ठेवण्यात आले होते. ज्यामध्ये पीडीपी अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या नावाचाही समावेश आहे. Mehbooba Muftis anger due to the excitement of removing Article 370

दरम्यान, मेहबुबा यांच्या पक्षाने या चर्चासत्रासाठी सरकारकडे परवानगी मागितली होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. मेहबूबा मुफ्ती यांनी यावर ट्विट करत त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्यांच्या पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

तर ‘’काश्मीर खोऱ्यात परिस्थिती सामान्य असल्याचा उल्लेख करून केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करत आहे. पण प्रत्यक्षात केंद्राने जी पावले उचलली. यावरून त्यांची भीती स्पष्टपणे दिसून येते. मुफ्ती यांनी लिहिले आहे की, एकीकडे कलम ३७० हटवल्याचा आनंद साजरा करण्यासाठी होर्डिंग्ज लावले जात आहेत. दुसरीकडे दडपशाहीतून जनतेच्या खऱ्या भावना चिरडल्या जात आहेत.’’ अशा शब्दांत मुफ्तींनी संताप व्यक्त केला आहे.

Mehbooba Muftis anger due to the excitement of removing Article 370

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात