विशेष प्रतिनिधी
मुंबई : मालेगाव मध्ये झालेले बॉम्बस्फोट हा हिंदू दहशतवादाचाच नमुना असल्याचे सिद्ध करण्यासाठी काँग्रेस प्रणित UPA सरकारने जंग जंग पछाडले होते. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना पकडण्यासाठी मेहबूब मुजावर या पोलीस अधिकाऱ्याची खास नियुक्ती केली होती, पण आज हा सगळा बनाव मेहबूब मुजावर यांनी स्वतःच उघड्यावर आणला. Mehboob mujawar
मेहबूब मुजावर हे ते अधिकारी होते, ज्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचे तपासाचे सगळे धागेदोरे उलगडले होते. त्या वेळच्या सरकारच्या narrative ला ते बळी पडली नाहीत म्हणून सरकारने त्यांना वेगळ्या खटल्यांमध्ये अडकवून तुरुंगात घातले होते. नंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती.
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागल्यानंतर मेहबूब मुजावर यांनी त्यातले वेगळे सत्य समोर आणले.
मेहबूब मुजावर म्हणाले :
मालेगाव मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा विषय हिंदू दहशतवादापर्यंत पोहोचविणे चूकच होते. बॉम्बस्फोटाचा तपास करायला हवा होता तो केला नाही. त्याच्या उलट भगवा दहशतवाद – हिरवा दहशतवाद हा खोटा वाद त्यावेळच्या सरकारने पसरविला होता. पण भगवा दहशतवाद सिद्ध करण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवतांना अडकवण्याचे त्यांचे कारस्थान होते यासाठी मला नेमले होते. मी फार धाडसी आहे मी नक्की मोहन भागवतांना पकडून आणू शकेल, असे त्यांना वाटले होते.
त्यासाठी परमवीर सिंग आणि आणि त्यांच्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला 10 जणांची टीम दिली होती. सीक्रेट सर्विस फंड मधून पैसे दिले होते. अँटी टेररिस्ट स्क्वाडच्या कोट्यातून पिस्तूल दिले होते. पाच कामासाठी मुलांना नागपूर, इंदूर, अजमेर, बेळगाव, गोकाक अशा अनेक ठिकाणी पाठविले होते. मी तिथे जाऊन तपास केला होता. नागपूर मध्ये तर दोन दिवस राहिलो, पण मी मोहन भागवतांना अटक केली नाही. कारण कुठल्याही खोट्या आरोपांमध्ये एवढ्या मोठ्या व्यक्तीला व्यक्तीला अटक करणे मला शक्य नव्हते. मी त्यावेळी जर मोहन भागवतांना अटक केली असती, तर आज माझी हालत काय झाली असती?
वरिष्ठांच्या आदेशानुसार मी मोहन भागवत यांना पकडले नाही. त्यांना अटक केली नाही म्हणून त्या वेळच्या सरकारने आणि पोलीस प्रशासनाने माझ्यावर वेगवेगळ्या खोट्या आरोपांखाली खटले दाखल केले. या खटल्या दरम्यान मी माझ्या जवळची सगळी कागदपत्रे पुरावे म्हणून NIA कोर्टाला सादर केली. 10 वर्षांपूर्वी त्यातून माझी निर्दोष सुटका झाली. मालेगावच्या खटल्यामध्ये देखील या कागदपत्रांचा वापर झाला. त्यांचा मालेगाव खटल्याचा निकालात उल्लेख केला गेला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App