विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशच्या पंचायत निवडणुकीत घडलेल्या हिंसाचारप्रकरणी बसपाच्या नेत्या मायावती यांनी भाजप सरकारवर कडाडून हल्ला केला आहे. राज्यात कायद्याचे नाही तर जंगलराज असल्याची टीका केली आहे. Mayawati targest UP govt.
केंद्र आणि राज्य सरकारमधील दलित मंत्री गप्प का बसले आहेत आणि ही बाब चिंता करण्यासारखी आहे, असेही मायावती म्हणाल्या. माजी मुख्यमंत्री मायावती यांनी ट्विटरवर म्हटले की, उत्तर प्रदेशमध्ये सध्या जंगलराज सुरू आहे. त्यामुळे पंचायत राज निवडणुकीत हिंसाचाराच्या असंख्य घटना घडत आहेत.
लखीमपुर खीर गावातील एका महिलेशी केलेले असभ्य वर्तन हे लाजीरवाणे असून हेच ते कायद्याचे राज्य आहे काय? असा सवाल केला. आझमगड जिल्ह्याप्रमाणेच चंदोली जिल्ह्यतील बर्थरा गावात दलितांच्या घरी गुंडांनी घातलेला गोंधळ व अत्याचार यावरुनही मायावतींनी टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App