अखिलेश यादव + मरिया आलम खानचा उत्तर प्रदेशात vote-jihad; राहुल – प्रियांकांचे हातावर हात!!

विशेष प्रतिनिधी

लखनौ : अखिलेश यादव + मरिया आलम खानचा उत्तर प्रदेशात vote-jihad; पण राहुल – प्रियांकांचा हातावर हात!! अशा हालचाली खरंच राज्यात घडत आहेत. vote-jihad या मुद्द्यावरून राज्यात मोठा गदारोळ उठला आहे. Mariya alam Khan provoked muslims for vote jihad

याची कहाणी अशी :

उत्तर प्रदेशात फारुखाबाद लोकसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांची भाची आणि समाजवादी पार्टीच्या महिला नेत्या मरिया आलम खान यांनी थेट मुसलमानांना शांतपणे vote-jihad करण्याचे आवाहन केले. मुसलमानांनी पुढे येऊन मतदान केले नाही, तर या देशातली लोकशाही धोक्यात येईल. अल्पसंख्यांकांचे अस्तित्व संपेल. मोदी सरकार इथे दंगली करून हत्याकांड घडवेल म्हणूनच मुसलमानांनी मोदींना रोखण्यासाठी आणि हेच संघी सरकार उखडून फेकण्यासाठी शांतपणे vote-jihad करावा, अशी प्रक्षोभक भाषा वापरली.

पण मरिया आलम खान यांनी vote-jihad हा शब्द वापरल्याने उत्तर प्रदेशात मोठा गदारोळ उठला. संपूर्ण देशभर त्या वक्तव्याचे पडसाद उमटले. सोशल मीडियात अखिलेश यादव आणि मरिया आलम खान ट्रोल झाले. मरिया आलम खान यांच्या वक्तव्यावर खुलासा देताना अखिलेश यादव यांची पुरती गोची झाली. त्यांना धड तिचे समर्थन करता येईना आणि तिचा विरोधी करता येईना!!

पण त्या पलीकडे जाऊन काँग्रेसने गेल्या दोन दिवसांत vote-jihad या मुद्द्यावर शब्द देखील उच्चारला नाही. वास्तविक उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली इथून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी स्वतः निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू आहे. त्यावर अजून काँग्रेस अध्यक्षांनी निर्णय घेतलेला नाही, पण उत्तर प्रदेश सारख्या महत्त्वाच्या राज्यात त्यांच्याच मित्रपक्षाने मित्र पक्षाच्या एका महिला नेत्याने मुसलमानांना शांतपणे vote-jihad चे आव्हान केले आणि त्यावर राहुल – प्रियांका हातावर हात ठेवून गप्प बसले. यावरून देखील काँग्रेस पक्ष अडचणीत सापडला आहे.

मरिया आलम खान यांच्या vote-jihad च्या आवाहनावरून भाजप आणि बाकीच्या पक्षांनी थेट निवडणूक आयोगात धाव घेऊन तक्रार केली. स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी मरिया आलम खान यांना ताबडतोब नोटीस बजावली. त्यामुळे हा विषय आणखी पेटला.

Mariya alam Khan provoked muslims for vote jihad

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात