राहुल गांधींनी सर्व, तर ममतांनीही केल्या प्रचाराच्या काही सभा कमी !

विशेष प्रतिनिधी 

कोलकता : निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांसाठी कोलकत्यात प्रचार न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला. तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी यांनी ट्विट करून ही माहिती दिली.Mammata didi canceled her poll ralies due to corona

‘‘ममता बॅनर्जी या कोलकत्यात प्रचार करणार नाहीत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे येत्या २६ रोजी त्या प्रतिकात्मक स्वरूपात केवळ एक बैठक घेतील. राज्यातील अन्या जिल्ह्यात त्या प्रचार करणार असल्या तरी त्याचा कालावधी कमी केला आहे.



आता त्या केवळ ३० मिनिटे प्रचारफेरी काढणार आहेत,’’ असे ओब्रायन यांनी म्ह टले आहे.ममता बॅनर्जी यांच्या आधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बंगालमध्ये प्रचार न करण्याची घोषणा काल केली. त्यांनी आतापर्यंत फक्त दोनच सभा घेतल्या आहेत.

पश्चि म बंगालमध्ये कोरोनाच्या प्रसार वेगाने होत असून काल दिवसभरात आठ हजार ४१९ रुग्ण आढळले. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या साडेसहा लाखांपेक्षा जास्त असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

Mammata didi canceled her poll ralies due to corona

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात