नाशिक : बंगाली अस्मितेच्या नावाखाली ममतांच्या तृणमूल काँग्रेसच्या सावरकरांना आणि गुजरात्यांना शिव्या, बंगालच्या निवडणुकीत मते मागायला धावा!!, असलाच प्रकार आज समोर आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर आरोपपत्र ठेवले. या आरोपपत्रामधील आरोपांना थेट उत्तरे देण्यापेक्षा ममता बॅनर्जी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आणि गुजराती समाजाला शिव्या देण्यात धन्यता मानली.
महुआ मोईत्रांची मुक्ताफळे
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या नेत्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन भलतेच दावे केले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व बंगाली समाजाने केले. याचा आम्हाला बंगाली समाजाला अभिमान वाटतो. काळ्यापाण्याची सजा भोणाऱ्यांमध्ये 60 % नावे बंगाली आढळतात. त्यांच्या पाठोपाठ पंजाबी नावे आढळतात. तुमचे “हिरो” वीर सावरकर काळ्या पाण्यावर होते. पण त्यांनी माफी मागून स्वतःची सुटका करून घेतली. त्याखेरीज त्यांनी काळ्या पाण्यावर काही केले नाही, अशी मुक्ताफळे महुआ मोईत्रा यांनी पत्रकार परिषदेत उधळली.
गुजराती समाजाला शिव्या
त्या पलीकडे जाऊन सुद्धा महुआ मोईत्रा यांनी गुजराती समाजाला शिव्या दिल्या. काळ्या पाण्याची सजा फक्त बंगाली आणि पंजाबी समाजातल्या लोकांनी भोगली. त्या काळ्या पाण्यावर सजा भोगलेला एक तरी गुजराती दाखवा. एकातरी गुजरात्याने स्वातंत्र्यलढ्यात काम केले का??, असा उद्दाम सवाल महुआ मोईत्रा यांनी केला. तुम्ही सगळ्या बंगाल्यांना एका झटक्यात गुन्हेगार ठरविले. 2000 पेक्षा जास्त बंगाल्यांना देशाबाहेर घालविले. पण गुजराती समाजाच्या काही नेत्याने काळ्या पाण्याची सजा भोगली नाही, असा दावा त्यांनी केला.
सुप्रीम कोर्टाचा राहुल गांधींना फाटका
काळ्या पाण्याच्या सभेच्या मुद्द्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या देणाऱ्या महुआ मोईत्रा या काही पहिल्याच खासदार नाहीत. याआधी राहुल गांधींनी सावरकरांच्या माफीनाम्याचा मुद्दा उकरून काढून त्याचा राजकीय लाभ घ्यायचा डाव खेळलाच होता पण तो डाव उधळला गेला. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी देखील ज्या लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांच्याविषयी तुम्ही अश्लाघ्य बोलता का??, असे म्हणून राहुल गांधींना फटकारले होते. थेट सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी फटकारल्यानंतर राहुल गांधींची भाषा सौम्य झाली होती.
बंगाली अस्मितेच्या नावाखाली शिव्या
पण राहुल गांधींना बसलेल्या फटक्यातून महुआ मोईत्रा किंवा काँग्रेसी परिवारातल्या कुठल्या पक्षाच्या नेत्याने व्यवस्थित धडा शिकला नाही म्हणून तर महुआ मोईत्रा यांनी सावरकरांचा पुन्हा अपमान करणारे वक्तव्य केले. त्यापलीकडे जाऊन गुजराती समाजाला सुद्धा बदनाम करायचे काम केले. या सगळ्यातून बंगाली अस्मितेच्या नावाखाली सावरकरांना आणि गुजरात्यांना शिव्या आणि बंगालच्या निवडणुकीत मते मागायला धावा!! असलाच अश्लाघ्य “डाव” उघड्यावर आला.
#WATCH | Kolkata | TMC MP Mahua Moitra says, "Bengalis are a very proud race. We led the war for independence against the British. Who were the Gujaratis?… 68% of the names of the people who were killed and incarcerated in Kala Pani were Bengalis, followed by Punjabis. Can you… pic.twitter.com/w61O2KpSQX — ANI (@ANI) March 28, 2026
#WATCH | Kolkata | TMC MP Mahua Moitra says, "Bengalis are a very proud race. We led the war for independence against the British. Who were the Gujaratis?… 68% of the names of the people who were killed and incarcerated in Kala Pani were Bengalis, followed by Punjabis. Can you… pic.twitter.com/w61O2KpSQX
— ANI (@ANI) March 28, 2026
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App