नवीन पटनायक यांना राजीनामा पत्र दिले आहे. Lok Sabha MP Anubhav Mohanty of Biju Janata Dal has left the party
विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांची तयारी जोरात सुरू आहे.
दरम्यान, नेत्यांचा पक्ष सोडून बाजू बदलण्याचा खेळही जोरात सुरू आहे. दरम्यान, ओडिशात नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाला निवडणुकीपूर्वी मोठा झटका बसला आहे. नवीन पटनायक यांच्या पक्षाचे केंद्रपारा येथील लोकसभा खासदार अनुभव मोहंती यांनी बिजू जनता दल सोडला आहे. नवीन पटनायक यांना राजीनामा पत्र दिले आहे.
तर, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App