वैष्णवी ढेरे
उगाचच धर्मनिरपेक्षतेच्या बाता मारणारी लोकं बरीच दिसतात. पण खोट्या धर्मनिरपेक्षतेचे कातडे ओढून चालणारे काही लांडगे असतात आणि याच लांडग्यांमुळे चुकीची परस्पेक्टिव्ह तयार होतात. धर्मभेद वाढत जातो. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे स्टॅन्डअप कॉमेडियन डॅनियल फर्नांडिस. Laughter is not sadness; Not even a laughing gallery, it’s a laughing gallery!!
स्वतःच्या धर्माला प्रोटेक्ट करत इतरांच्या धर्माला अंडरस्टिमेट करणारे लाइन्स युज करून लोकांमध्ये हसण्याच्या द्वारे मतभेद तयार करायचे काम हा करतो. प्रख्यात हास्य चित्रकार शि. द. फडणीस यांनी हसरी गॅलरी निर्माण केली. चार्ली चॅपलीन यांनी हसरे दुःख जगाला दाखवले. हसरे दुःख नावाचे चार्ली चॅपलीनवर आधारित पुस्तक आहे. त्यात विनोदी चेहरा किंवा विनोद निर्माण करणारा माणूस हा आतून किती हळवा असू शकतो आणि परिस्थितीने दुखावल्या गेलेला असू शकतो हे दाखवले आहे. पण “हसरी चालूगिरी” मात्र डॅनियल फर्नांडिस सारख्या स्वतःला कॉमेडियन म्हणून घेणाऱ्या लोकांमध्येच दिसते!!
विनोद ही एक दुःख बाजूला सारण्यासाठी, तर कधी कधी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी उपयुक्त अशी कला आहे. पण याच विनोदावीरमुळे नी त्याच्या विनोदामुळे जर का धर्मभेद तयार होत असेल तर याला कलाकार आणि कला कसे म्हणावे?? डॅनियलने तो मोदीविरोधी असल्याचे प्रत्येक वेळेस आपल्या शोमधून दाखवून दिले आहे. “जिन्होने मोदी को व्होट दिया, उन्हे अस्पताल मे जगह मत दो” असं म्हणत त्यानेच कोविड हॉस्पिटल्स उचकविले. त्यावर तो ट्रोल झाला. पण त्यावर माफी न मागता, ज्या लोकांनी त्याची चूक त्याला दाखवून दिली त्यांनी त्या कमेंट्स रिपोस्ट करत त्यावर त्याने हेकेखोरपणे उत्तरे दिली. हिंदू धर्माबद्दल ठामपणे चुकीची मते व्यक्त करत सतत लोकांच्या मनात किंतु-परंतु निर्माण करत राहिला. पण हिंदू सनातन धर्म सोडून जेव्हा इतर धर्मांवर भाष्य करायची वेळ आली, तेव्हा मात्र बीपचा वापर करून ते शब्द गाळून टाकण्यात आले.
अशाच धर्मभेद करणाऱ्या लोकांना कलाकार म्हणून स्वीकारायचे का?? कला ही माणसाला सुख आनंद देणारी असावी. विनोद माणसातली विसंगती सांगणार पण निर्विष असावा. पण हीच कला आणि विनोद जेव्हा सिलेक्टिव्हली एकाच धर्माला टार्गेट करत असेल, माणसाच्या मनात शंका निर्माण करून असंतोष माजवणारा असेल तर त्याला कला अथवा विनोद म्हणावा का?
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App