Tragedy in Kota : कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली, अनेक जण दबले; रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणि कर्मचारी होते

Tragedy in Kota

वृत्तसंस्था

कोटा : Tragedy in Kota राजस्थानमधील कोटा येथे शनिवारी रात्री सुमारे 9 वाजता एक 3 मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले असल्याची भीती आहे. माहिती मिळताच पोलिस पथक आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 7 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Tragedy in Kota

मिळालेल्या माहितीनुसार, तलवंडी परिसरात या इमारतीत एक रेस्टॉरंट सुरू होते. घटनेच्या वेळी काही ग्राहक आणि रेस्टॉरंटमध्ये काम करणारे 12 ते 15 कर्मचारी उपस्थित होते, जे ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती आहे. परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.Tragedy in Kota



प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आम्हाला फटाके फुटल्यासारखा आवाज आला. आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो. रात्री सुमारे 9 वाजता स्फोटाचा आवाज आला आणि इमारत कोसळली. आत मधून ‘वाचवा-वाचवा’ असे आवाज येत होते.

या इमारतीच्या मागील इमारतीत अनेक दिवसांपासून काम सुरू आहे. दररोज ड्रिल मशीन, हॅमर चालवले जातात, त्यामुळे संपूर्ण इमारतीत कंपन होत होते.

Tragedy in Kota: 2 Dead, Over 15 Trapped as Restaurant Building Collapses

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात