आफताबचा दुसरा कारनामा : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कपाटात ठेवून फ्लॅटवर दुसऱ्या मुली बरोबर डेटिंग

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लव्ह जिहाद प्रकरणातला श्रद्धा वालकर हिचा खूनी आफताब अमीन पूनावाला याचा दुसरा कारनामा समोर आला आहे. श्रद्धाचा खून करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्यानंतर ते त्याने आधी कपाटामध्ये ठेवले आणि त्यानंतर 20 – 25 दिवसांनी दुसऱ्या मुलीला तो फ्लॅटवर डेट साठी घेऊन आला होता. त्याने तिच्याबरोबर मजा मारली त्यावेळी तो कपाटात ठेवलेला श्रद्धाचा चेहराही बघत असे. पोलीस तपासातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. Keeping Shraddha’s dead body in the closet and dating another girl in the flat

आफताब एवढा नीच आणि निर्ढावलेला खुनी निघाला की त्याला कोणताही पश्चाताप झालेला पोलीस तपासात दिसलेला नाही. पोलीस तपासात सुरुवातीला आपल्याला हिंदी येत नाही, असे सांगून सतत इंग्लिश मध्ये बोलूनच आपल्या घृणास्पद कृत्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला मेहरोली परिसरातील घटनास्थळी नेऊन श्रद्धाच्या मृतदेहाचे 10 तुकडे ताब्यात घेतले आणि ते टेस्टसाठी पाठवले आहेत. श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावता यावी आणि ते जंगलात फेकता यावेत यासाठी त्याने मेहरोलीच्या जंगलाजवळच फ्लॅट भाड्याने घेतला होता.

आफताबला मृत्युदंड द्या

श्रद्धाचा खून लव्ह जिहाद मधूनच झाला आहे. ती आपल्याशी नीट बोलत नव्हती. पण ती तिच्या आकांक्षा काकांच्या नेहमी संपर्कात असायची असे सांगून श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी आफताबला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्याची मागणी केली आहे.

Keeping Shraddha’s dead body in the closet and dating another girl in the flat

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात