Good news! आता ‘या’ देशात जाण्यासाठी भारतीयांना गरजेचा नसेल ‘Visa’

जाणून घ्या, सरकारने काय केली आहे घोषणा


विशेष प्रतिनिधी

भारताच्या पासपोर्टची ताकद सतत वाढत आहे, ही भारतीयांसाठी एक चांगली बातमी आहे. आता भारतीय फक्त आपल्या पासपोर्टच्या आधारावर आणखी एक देश फिरू शकणार आहेत. यासाठी त्यांना व्हिसाची गरज भासणार नाही.Iran government cancels visa requirement for Indians

इराण सरकारने भारताला ही भेट दिली आहे. इराणचा उद्देश आपल्या देशातील पर्यटनाला चालना देणे आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणे हा आहे.



इराणने भारतासह 33 देशांसाठी व्हिसाची अट रद्द केली आहे. आता या देशांतील लोक व्हिसाशिवाय इराणमध्ये जाऊ शकणार आहेत. भारतीयांना इराणचा सांस्कृतिक वारसा आणि पर्यटनही जाणून घेता येणार आहे. याबाबत इराणचे सांस्कृतिक वारसा मंत्री एझातोल्लाह जरघामी म्हणाले की, जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

इराणने भारतासह अनेक देशांतील पर्यटकांसाठी व्हिसा आवश्यकता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्युनिशिया, लेबनॉन, सौदी अरेबिया, अनेक मध्य आशियाई, आफ्रिकन आणि मुस्लिम देशांसह सुमारे 33 देशांना प्रवासासाठी मोफत व्हिसा भेट देण्यात आला आहे. तसेच, नाटो आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या पाश्चात्य मित्र युरोपीय राष्ट्र क्रोएशियाच्या लोकांनाही ही भेट मिळाली आहे.

Iran government cancels visa requirement for Indians

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात