गेल्या तीन वर्षांत तब्बल 3.92 लाख भारतीयांनी सोडले देशाचे नागरिकत्व, 1.70 लाखा अमेरिकेत स्थायिक


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मागच्या तीन वर्षांत 3.92 लाख भारतीयांनी देशाचे नागरिकत्व सोडले. यापैकी सर्वाधिक 1.70 लाख लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. लोकसभेमध्ये ही माहिती देण्यात आली. त्यानुसार या भारतीयांनी 120 देशांचे नागरिकत्व घेतले आहे.In the last three years, as many as 3.92 lakh Indians left the country’s citizenship, 1.70 lakh settled in America.

आकडेवारीनुसार, 2019 नंतर सर्वाधिक 1,63,370 लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले. तीन वर्षांत नागरिकत्व सोडणाऱ्यांची दिवसाची सरासरी पाहता ही संख्या 358 आहे. तर गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये रोज सरासरी 447 भारतीयांनी नागरिकत्व सोडले. अमेरिकेने 2019 मध्ये 61,683, तर 2020 मध्ये 30,828 व 2021 मध्ये 78,284 भारतीयांना नागरिकत्व बहाल केले.



भारतीयांना नागरिकत्व देणारे टॉप 10 देश

अमेरिका – 1,70,795
कॅनडा 64,071
ऑस्ट्रेलिया 58,391
ब्रिटन 35,435
इटली 12,131
न्यूझीलंड 8,882
सिंगापूर 7,046
जर्मनी 6,690
स्वीडन 3,754
पाकिस्तान 48

In the last three years, as many as 3.92 lakh Indians left the country’s citizenship, 1.70 lakh settled in America.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात