वृत्तसंस्था
पणजी : गोव्यात घटस्फोटाच्या घटना वाढत आहेत. विशेष म्हणजे नवदांपत्ये लग्नानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यांतच घटस्फोट घेत आहेत. या पार्श्वभूमीवर घटस्फोटाच्या घटना रोखण्यासाठी सरकारनं लग्नाच्या आधी समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला. In Goa Divorce of Newlyweds are increasing day by day
गोव्याचे कायदा मंत्री निलेश काब्राल म्हणाले, विवाह नोंदणी व लग्नापूर्वी 15 दिवसांच्या आत या जोडप्याला समुपदेशनासाठी बोलावलं जाईल.लग्न मोडणे ही चिंतेची बाब आहे. दोन-चार महिने, एक वर्ष किंवा तीन वर्षांत बरेच घटस्फोट होत आहेत. त्यामुळे आम्ही चिंताग्रस्त आहोत. गोव्याच्या चर्चमध्ये लग्नाआधीच समुपदेशन सुरू आहे. परंतु आता इतर धर्मातील लोकांपर्यंतही याचा विस्तार केला जाईल. ते पुढे म्हणाले, ‘समुपदेशनानंतरच त्यांना विवाह प्रमाणपत्र देण्यात येईल.’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App