Goa Municipal Election 2021 : पणजीमध्ये भाजपची जोरदार आघाडी, काँग्रेस पिछाडीवर

  • कोरोनामुळे लांबलेल्या स्थानिक निवडणूक अखेर पार पडत आहे.

  • या निवडणुकीत सर्वाधिक लक्ष राजधानी पणजीच्या महानगरपालिकेकडे लागेलं असून इथं 30 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे .भाजप पुरस्कृत टुगेदर फॉर प्रोग्रेसिव्ह आणि आम्ही पणजीकर या पॅनल मध्ये मुख्य चुरस आहे.

  • मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. त्यानुसार भाजप पुरस्कृत गटाने जोरदार आघाडी घेतली आहे.

  • पणजी महानगरपालिका आणि सहा नगरपालिकांच्या 421 जागांसाठी ही मतमोजणी होत आहे. एकूण 423 उमेदवारांच्या भविष्याचा आज फैसला होणार आहे. Goa Municipal Election 2021 : BJP’s strong lead in Panaji, Congress lags behind

विशेष प्रतिनिधी

गोवा : गोव्याची राजधानी पणजी महानगरपालिकेसह, 17 ग्रामपंचायती, 6 नगरपालिकेसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीचा पहिला कल हाती आला आहे. त्यानुसार भाजप पुरस्कृत गटाने जोरदार आघाडी घेतली आहे. भाजप 9 जागांवर आघाडीवर आहे. तर आम्ही पणजीकर गटाने 4 जागांवर आघाडी घेतली आहे.

पणजी महानगरपालिकेसह 6 नगरपालिकांचे आज मतमोजणी होत आहे. यात डिचोली, पेडणे, वाळपई, कुडचडे, कानकोन आणि कुंकळी या नगरपालिकांचा समावेश आहे. याबरोबरच नावेली जिल्हा पंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून ग्रामपंचायतींच्या अठरा जागांसाठी पोट निवडणूकींची मतमोजणी आज होत आहे.गोव्यात महापालिका, 6 ग्रामपंचायती, नावेली जिल्हा पंचायत आणि सांखळी पालिकेच्या एका प्रभागासाठी मतमोजणी सुरू झाली आहे. आम्ही पणजीकर गटाला काँग्रेस पुरस्कृत असल्याचे सांगितले जात आहे. साडेआठ वाजता मतमोजणी ला सुरुवात झाली असून 11 वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहेत.

या निवडणुका पक्षीय पातळीवर न झाल्याने स्थानिक पॅनल आणि अपक्ष उमेदवारांचा भरणा या निवडणुकीत जास्त आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा हे निवडून आलेल्या उमेदवारांच्या अंतिम निर्णय नंतरच ठरेल, मात्र सध्यातरी गोव्यात सत्तेवर असलेला भाजप आणि विरोधी काँग्रेस आणि इतर पक्षांनी अनेक उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

Goa Municipal Election 2021 : BJP’s strong lead in Panaji, Congress lags behind

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*