• Download App
    आंदोलन करायचे असेल तर दिल्ली किंवा हरियाणाला जा, नुकसान होतेय म्हणत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा राज्यात शेतकरी आंदोलनाला विरोध|If you want to agitate, go to Delhi or Haryana, Punjab Chief Minister opposes farmers' agitation in the state saying there is loss

    आंदोलन करायचे असेल तर दिल्ली किंवा हरियाणाला जा, नुकसान होतेय म्हणत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा राज्यात शेतकरी आंदोलनाला विरोध

    विशेष प्रतिनिधी

    अमृतसर : आत्तापर्यंत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांची भूमिका अचानक बदलली आहे. आंदोलनच करायचे असेल तर पंजाबऐवजी दिल्ली किंवा हरियाणात जा. आंदोलनामुळे राज्याचे नुकसान होत आहे, अशा शब्दांत त्यांनी शेतकऱ्यांना सुनावले आहे.If you want to agitate, go to Delhi or Haryana, Punjab Chief Minister opposes farmers’ agitation in the state saying there is loss

    होशियारपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना कॅ. अमरिंदर सिंग म्हणाले, राज्यात ११३ ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन होत आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना धरणे धरायचेच असेल तर त्यांनी पंजाबऐवजी दिल्ली किंवा हरियाणा येथे जावे.



    शिरोमणी अकाली दलावर हल्ला चढविताना कॅ. अमरिंदर सिंग म्हणाले, नवीन कृषि कायदे तयार केले जात होते तेव्हा अकाली दलाची त्याला मान्यता होती. याचे कारण म्हणजे हरसिमरत कौर बादल या केंद्रीय मंत्री होत्या. स्वत: प्रकाशसिंह बादल यांनी नव्या कायद्यांचे समर्थन केले होते. मात्र, शेतकरी या कायद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्यावर त्यांची भूमिका बदलली.

    आत्तापर्यंत १२७ वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. मग शेतकऱ्यांच्या हितासाठी आणखी एकदा घटनादुरुस्ती करण्यास काय हरकत आहे असा सवाल करून कॅ. अमरिंदर सिंग म्हणाले, शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला पाच लाख रुपये मदतनिधी आणि कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे काम कॉँग्रेसच्या सरकारने केले आहे

    If you want to agitate, go to Delhi or Haryana, Punjab Chief Minister opposes farmers’ agitation in the state saying there is loss

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य