• Download App
    मुंबईत गणेशोत्वाच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली, दोन महिन्यांनंतर रुग्णसंख्या ५०० वर Corona increasing rapidly in Mumbai

    मुंबईत गणेशोत्वाच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली, दोन महिन्यांनंतर रुग्णसंख्या ५०० वर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – मुंबईमध्ये कोविड रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून काल तब्बल ५३० बाधित आढळले आहेत. साधारणत: दोन महिन्यांनंतर रुग्णसंख्या ५००च्या वर गेली आहे. Corona increasing rapidly in Mumbai

    त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यात दिलादायक बाब म्हणजे मृत्यू अजूनही नियंत्रणात असून मुंबईत काल चार कोविड रुग्णांचा मृत्यू झाला.
    गेल्या आठवड्यापर्यंत २५० पर्यंत खाली गेलेला रुग्णांचा आकडा मुंबईत हळूहळू वाढत आहे.



    यापूर्वी ११ जुलै रोजी ५५५ बाधित रुग्ण सापडले होते; तर १२ जुलैला ४७८ रुग्ण सापडल्याने ५०० च्या आत रुग्ण आले होते. त्यानंतर आता दोन महिन्यांनंतर दैनंदिन रुग्णसंख्या ५०० च्या वर पोहोचली आहे. सध्या ३,८९५ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईतील रुग्णांची एकूण संख्या ७,४७,६०८ वर पोहोचली आहे; तर मृतांचा आकडा १६,००४ वर गेला आहे.

    आज मृत्यू झालेल्या चौघांपैकी तिघांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये चार पुरुषांचा समावेश होता. त्यातील दोघांचे वय ४० ते ६० दरम्यान होते. उर्वरित दोघे ६० हून अधिक वर्षांचे होते. तसेच मुंबईत आज ४८,५२१ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून पॉझिटिव्हीटी दर १.०९ टक्के इतका आहे.

    Corona increasing rapidly in Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार? खासदार सुनील तटकरेंनी दिले स्पष्टीकरण

    Chhagan Bhujbal : धर्मेंद्र प्रधानांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता; पोलिस लाठीचार्ज अन् देशातील संताप टळला, छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर

    Gunratna Sadavarte : ठाकरे हे आपल्या दोन्ही लेकरांच्या प्रमोशनसाठी आले; गुणरत्न सदावर्तेंची तिरंगा रॅलीवर टीका, म्हणाले- घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली