विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमामुळे देशात आणि परदेशात प्रचंड उत्साह पसरला असताना देशातल्या INDI आघाडीतल्या घटक पक्षांची मात्र तीव्र राजकीय कोंडी झाली आहे. त्यांचे “धरले तर चावते सोडले तर पळते” अशा म्हणीसारखी अवस्था होऊन राम मंदिराच्या सोहळ्याला जावे की न जावे??, असा यक्ष प्रश्न त्यांच्या नेत्यांपुढे उभा राहिला आहे.‘If Congress wants to…’: What Harbhajan Singh said on Ayodhya’s Ram temple, his faith and PM Modi
#WATCH दुबई: कांग्रेस द्वारा राम मंदिर 'प्राण प्रतिष्ठा' समारोह के निमंत्रण को अस्वीकार करने पर पूर्व क्रिकेटर और राज्यसभा सांसद हरभजन सिंह ने कहा, "यह हमारा सौभाग्य है कि हमारे दौर में ये मंदिर बन रहा है इसलिए हम सभी को जाकर आशीर्वाद लेना चाहिए। कोई भी पार्टी जाए या न जाए मैं… pic.twitter.com/Mz98Tv3VHF — ANI_HindiNews (@AHindinews) January 19, 2024
#WATCH दुबई: कांग्रेस द्वारा राम मंदिर 'प्राण प्रतिष्ठा' समारोह के निमंत्रण को अस्वीकार करने पर पूर्व क्रिकेटर और राज्यसभा सांसद हरभजन सिंह ने कहा, "यह हमारा सौभाग्य है कि हमारे दौर में ये मंदिर बन रहा है इसलिए हम सभी को जाकर आशीर्वाद लेना चाहिए। कोई भी पार्टी जाए या न जाए मैं… pic.twitter.com/Mz98Tv3VHF
— ANI_HindiNews (@AHindinews) January 19, 2024
इतकेच नाही तर INDI आघाडीतले घटक पक्ष काँग्रेस, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रमुखांनी अयोध्येचे निमंत्रण नाकारले असले तरी त्यांचे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते मात्र अयोध्येला जायला अतिशय आतुर झाले आहेत. ते आपल्याच पक्षातल्या नेत्यांना वेगवेगळी वक्तव्य करून घरचा आहेर देत आहेत. असेच वक्तव्य करून भारताचा माजी फिरकीपटू आणि आम आदमी पार्टीचा राज्यसभा खासदार हरभजन सिंह याने आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्या नेतृत्वांना घरचा आहेर दिला आहे.
राम माझ्या आस्थेचा विषय आहे. आज जो मी कोणी आहे, जे नाव कमावले आहे, ही परमेश्वराचीच कृपा आहे. त्यामुळे मी अयोध्येत राम दर्शनाला जाणार. काँग्रेसच्या नेत्यांना किंवा बाकी कोणत्या पक्षाच्या नेत्यांना तिथे जायचे तर जावे किंवा जाऊ नये. त्याच्याशी मला काही देणे घेणे नाही. मी मात्र रामाच्या दर्शनाला जाणार, असे ठाम वक्तव्य हरभजन सिंह यांनी केले.
त्यामुळे काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि INDI आघाडीतल्या बाकीच्या घटक पक्षाच्या नेत्यांची पुन्हा एकदा कोंडी झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App