स्वातंत्र्यदिनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेस नागरिकांचा भरघोस प्रतिसाद; राष्ट्रध्वजासोबतचे कोट्यवधी सेल्फी वेबसाइटवर झाले अपलोड!

PHOTOS Republic Day: ITBP soldiers hoist flag at minus 40 degree Celsius, announce 'Bharat Mata Ki Jai

भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात जल्लोषाचे वातारवण पाहायला मिळाले.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  भारताच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात जल्लोषाचे वातारवण पाहायला मिळाले. संपूर्ण देश उत्साहाने स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. काल सकाळी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वच ठिकाणी ध्वजारोहण झाले. नागरिकांनी भारत माता की जय…वंदे मातरम..  अशा घोषणा देत आपले राष्ट्राप्रतीचे प्रेम व्यक्त केले. तर परंपरेनुसार दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंगा ध्वज फडकावला आणि देशाला संबोधित केले. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार कोट्यवधी भारतीयांनी आपल्या तिरंगा ध्वजासह सेल्फी काढले आणि ते केंद्र सरकारने  दिलेल्या वेबसाइटवर अपोलडही केले. Huge response of citizens to Har Ghar Triranga campaign on Independence Day Millions of selfies with the national flag have been uploaded on the website

हर घर तिरंगा या मोहिमेस देशवासीयांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. सायंकाळी सहा वाजपर्यंत जवळपास १० कोटी नागरिकांनी तिरंगा ध्वजासोबतचे आपले सेल्फी वेबसाईटवर अपलोड केल्याचे दिसून आले.  विशेष म्हणजे हे सेल्फी वेबासाइटवर अपलोड करताच  नमूद केलेल्या नावासह तत्काळ सर्टिफिकेटही देण्यात आले आहे.

हर घर तिरंगा वेबसाइटच्या होम पेजवर ध्वजासह सेल्फी अपलोड करण्याचा पर्याय दिसतो. 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी तीन दिवसीय ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा एक भाग म्हणून 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान जनतेला त्यांच्या घरी ध्वज फडकावण्यास सांगितले गेले होते.

Huge response of citizens to Har Ghar Triranga campaign on Independence Day Millions of selfies with the national flag have been uploaded on the website

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात