विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हिमालयातील एका योग्याच्या सल्ल्याने नॅशनल स्टॉक एक्सेंज चालविणाºया चित्रा रामकृष्ण यांची अध्यक्षपदी नियुक्ती केलीच कशी असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना केला आहे.How did Chitra Ramakrishna get appointed as president who on the advice of the Yogi runs a stock exchange ? Nirmala Sitharaman’s question to Manmohan Singh
सीतारामन म्हणाल्या, तुम्ही पंतप्रधान असताना देशाच्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिले नाही. 2013साली तुम्ही अशा व्यक्तीला नॅशनल स्टॉक एक्सेंजच्या अध्यक्षपदी नेमले ज्यांनी हिमालयतील एका योग्याच्या सल्ल्याने कारभार चालविला होता. भारताचे सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज असलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण स्टॉक एक्सचेंजचे निर्णय घेण्यासाठी चक्क हिमालयात बसलेल्या एका योगी बाबांची मदत घेत होत्या.
मार्केट रेग्युलेटर सेबीने त्यांच्यावर हे आरोप केले आहेत. महत्त्वाची आणि गोपनीय माहिती शेअर केल्याबद्दल त्या वादात अडकल्या आहेत. आगामी पाच वषार्तील काय प्लॅन आहे?, कोणते मोठे निर्णय घेतले जाणार आहेत? अशी सारी माहिती त्या शेअर करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
2014 मध्ये केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर भारतात गरीब अधिक गरीब झाल्याच्या आरोपावरही सीतारामन यांनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या, कॉँग्रेसने हे ऑक्सफॅमच्या अहवालानुसार म्हटले आहे. परंतु, मुळात या अहवालाची कार्यपद्धतीच चुकीची आहे. त्यांनी वापरलेले सूत्र चुकीचे आहे.
हा अहवाल सरकारी योजनांकडे पाहत नाहीत. भाजपचे सरकार तुमच्याकडे काहीही नसले तरीही तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देत आहे. दिलेल्या कजार्मुळे तुमचे दायित्व वाढत असल्यास या अहवालात गरिबी वाढत असल्याचे मानले जाते. आर्थिक समावेशाच्या मार्गाने सरकारी हस्तक्षेपाचा अजिबात विचार केला जात नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App