Hardik Patel : धरला काँग्रेस बाहेरचा रस्ता; भाजपच्या मार्गावर वाटचाल!!; हार्दिकने ट्विटर बायोमधली “काँग्रेस” हटवली


वृत्तसंस्था

अहमदाबाद : पाटीदार समाजाचा गुजरात मधला तरुण नेता आणि काँग्रेसचा स्वतःहून मावळता कार्यकारी प्रदेशाध्यक्ष हार्दिक पटेल याने अखेर काँग्रेस बाहेरचा रस्ता धरला आहे. त्याची वाटचाल आता भाजपच्या मार्गावर होताना दिसत आहे. Held the road outside Congress; Walk on the path of BJP harding patel

हार्दिकने आज दुपारी आपल्या ट्विटर हँडल वरून आपले अधिकृत असलेले काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष पदाचे नामाभिधान हटविले. याचाच राजकीय अर्थ आता हार्दिक पटेल काँग्रेसच्या बाहेर गेल्याचा काढण्यात येत आहे. हार्दिक पटेल याने उघडपणे गुजरात काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्व विरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात आपण नाराज नाही. परंतु, प्रदेश पातळीवरचे काँग्रेसचे नेते आपल्या कोणता उपयोगच करून घेत नाहीत.

मी 28 वर्षांचा आहे. तरुण आहे. मी काँग्रेस संघटनेसाठी राज्यात आणि देशात प्रचंड फिरू शकतो. परंतु, प्रदेश नेतृत्व गुजरात मध्ये काँग्रेस संघटनेसाठी मला कामच करू देत नाही, असा आरोप हार्दिकने उघडपणे पत्रकारांशी बोलताना केला होता. त्याने काँग्रेसचे संघटन सरचिटणीस वेणुगोपाल यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे त्यांच्या कानावर घातले होते. परंतु गेल्या 15 दिवसांत या तक्रारी विषयी काँग्रेस हायकमांडने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर हार्दिक पटेलने काँग्रेस बाहेरचा रस्ता धरल्याचे स्पष्ट झाले आहे.

मी लढेन आणि मी जिंकेन, असे त्याने आपल्या ट्विटर बायो मध्ये स्पष्ट केले आहे. याचा अर्थ देखील आता हार्दिक पटेलची वाटचाल भाजपच्या दिशेने सुरू झाल्याचे काढण्यात येत आहे. पाटीदार समाजाचा एक तरुण नेता भाजपकडे आल्याने आधीच प्रबळ असलेल्या भाजपला आणखी राजकीय बूस्टर डोस मिळणार आहे.

Held the road outside Congress; Walk on the path of BJP harding patel

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात