विशेष प्रतिनिधी
लखनऊ : वडील आणि काकांचेही जो ऐकत नाही तो तुमचे काय ऐकणार असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जयंत चौधरी यांना केला आहे. या माध्यमातून त्यांनी जयंत चौधरी यांना पुन्हा एकदा आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.He dont listen to r father and uncle, Amit Shah’s question to Jayant Chaudhary,
पश्चिम उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये प्रचार करताना अमित शहा बोलत होते. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी आरएलडीने समाजवादी पक्षासोबत युती केली आहे. अमित शाह म्हणाले, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी जयंत चौधरी यांना युतीसाठी तयार केले आहे.
परंतु, त्यांचा आवाज ऐकला जाणार नाही. जयंत बाबूंना माहीत नाही की सपाने सरकार स्थापन केले तर त्यांचा आवाज दाबला जाईल. जो वडिलांचे आणि कुटुंबाचे ऐकत नाही तो तुमचे ऐकणार नाही.गृहमंत्र्यांनी २६ जानेवारी रोजी जाट नेत्यांशी संपर्क साधताना सांगितले की,
जयंत चौधरी यांनी चुकीचे घर निवडले आहे. भाजपमध्ये त्यांच्यासाठी दरवाजे खुले असल्याचे संकेत दिले होते. दोन दिवसांनी जयंत चौधरी यांनी भाजप जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. ते कधीही भगव्या पक्षात सामील होणार नाही असे उत्तर दिले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App