मोहब्बतच्या दुकानातून दानिश अलीला मिठ्या; पण पंतप्रधानांना अश्लील शिव्या!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजप खासदार रमेश बिधूडी यांनी लोकसभेत बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांना उद्देशून अपशब्द काढल्याबरोबर मोहब्बतच्या दुकानातून दोन जण बाहेर पडले आणि दानिश अलींना भेटून आले. राहुल गांधी आणि के. सी. वेणूगोपाल दानिश अलींना भेटले. मोहब्बतच्या दुकानदाराने दानिश अलींना मिठी मारल्याचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. राहुल गांधी आणि दानिश अली यांची जवळीक वाढल्याचे दिसले. Haryana PCC president uday bhan abused PM Modi, but Congress Congress keeps mum

या सर्व प्रकारात सुरुवातीला भाजपला बॅकफूटवर जावे लागले होते. कारण रमेश बिधूडी यांनी खासदार दानिश अली यांना उद्देशून वापरलेले अपशब्द केवळ असंसदीयच नव्हते, तर ते सभ्यतेला बिलकुलच धरून नव्हते. त्यामुळे लोकसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना माफी मागावी लागली. भाजपने खासदार रमेश बिधूडी यांना शो कॉज नोटीस पाठवली.

पण मोहब्बतच्या दुकानाने रमेश बिधूडी – दानिश अली वादाचा राजकीय फायदा उपटण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण आता याच मोहब्बतच्या दुकानाच्या हरियाणा ब्रांचच्या प्रमुखाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आशिल शिव्या दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष उदय भान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या नावाने अश्लिल शिव्या दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वरती “रंडवा” राज करत आहे खाली “पंडवा” राज करतोय. वरच्याने पत्नीला सोडून दिले. खालच्याला घर म्हणजे काय हे माहितीच नाही, अशी अश्लाघ्य टीका सुरज भान यांनी केली. त्यावर भाजपने त्यांना ठोकून काढले. सुरज भान सोशल मीडियावर ट्रोल देखील झाले, पण त्यांनी आपली वक्तव्य मागे न घेता त्याचे समर्थन चालविले आहे.

एकीकडे भाजपच्या खासदाराने बहुजन समाज पक्षाच्या खासदाराला अपशब्द वापरले म्हणून भाजपने आपल्याच खासदाराला नोटीस बजावली. मोहब्बतच्या दुकानातून बहुजन समाज पक्षाच्या खासदाराला मिठीत घेण्यात आले, पण दुसरीकडे आपल्याच मोहब्बतच्या दुकानाच्या हरियाणा ब्रांचचा प्रमुख पंतप्रधानांना अश्लील शिव्या देतो, याविषयी मात्र सोयीस्करपणे दुकानाचे शटर डाऊन आहे. म्हणजे काँग्रेस कडून कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाही.

Haryana PCC president uday bhan abused PM Modi, but Congress Congress keeps mum

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात