Haryana Election : काँग्रेसमधल्या नेत्यांनाच भूपेंद्र सिंग हुड्डांची सत्ता नकोय; हरियाणात बाजी पलटताच भाजप नेत्याचा गौप्यस्फोट!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हरियाणात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत एक्झिट पोलचे निष्कर्ष सुरुवातीच्या काळात यशस्वी ठरल्याचे दिसत असून राज्यातली बाजी पलटून भाजपने काँग्रेसवर मात केल्याचे चित्र निर्माण झाले आहे एक्झिट पोल मध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता दाखवली होती. प्रत्यक्षात भाजपने बाजी पलटवून काँग्रेसवर मोठी आघाडी घेतल्याचे चित्र मतमोजणीतून समोर आले. त्यामुळे हरियाणात भाजपच्या नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह पसरला असून या नेत्यांनी काँग्रेसला चिमटे काढायला सुरुवात केली आहे. Haryana Election BJP is leading in the elections

हरियाणाचे माजी गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अनिल विज यांनी मुख्यमंत्रीपदाच्या रेस मधले काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंग हुड्डा यांना चिमटा काढला असून काँग्रेस मधल्याच अनेक नेत्यांना त्यांची सत्ता नको होती. त्यामुळे जनतेने देखील त्यांना नाकारले, असा टोला विज यांनी हाणला. भाजप जनतेने दिलेला कौल नम्रतेने स्वीकारत आहे. भाजप सत्ता स्थापन करेल असा विश्वास विज यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी मात्र सर्व मतमोजणीचा सुरुवातीचा कौल नाकारला. हरियाणा काँग्रेसच विजयी होणार आहे काँग्रेसची सत्ता स्थापन होणार आहे असा दावा पवन खेडा यांनी केला.

Haryana Election BJP is leading in the elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात