गोरखपूरच्या प्रतिज्ञा रॅलीत प्रियांकांचे सरदार वल्लभभाई आणि इंदिराजी यांच्याबरोबर समान उंचीचे कटआउट!!


वृत्तसंस्था

गोरखपुर : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज योगींच्या गोरखपुरमधल्या रॅलीतून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी हुंकार भरला. पण या रॅलीचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे प्रियांका गांधी यांचे कटआउट सरदार वल्लभभाई पटेल आणि दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बरोबरीच्या उंचीचे लावण्यात आले होते. याच रॅलीत अनेक महिलांच्या हातात “मै भी प्रियांका” असे फलकही देण्यात आले होते. Gorakhpur: Cutouts of former PM Indira Gandhi and Sardar Vallabhbhai Patel put up at the venue of Congress party’s ‘Pratigya Rally’ where party general secretary Priyanka Gandhi Vadra will arrive shortly.प्रियांका गांधी उत्तर प्रदेशात योगी सरकार विरोधात मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती करण्यात मग्न आहेत. आज सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिराजी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांचा राजकीय वारसा सांगण्याचा प्रयत्न प्रियांका गांधी यांनी केलेला दिसत आहे. आत्तापर्यंत काँग्रेसच्या रॅलीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना एवढ्या ठळक प्रमाणात स्थान दिल्याचे आढळलेले नाही. अनेक काँग्रेस नेत्यांच्या बरोबरीने सरदार वल्लभभाई पटेल यांचे कटआउट किंवा फोटो रॅलीमध्ये असायचे. पण प्रथमच इंदिराजी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे समान उंचीचे कटआउट प्रियांका गांधी यांच्या रॅलीमध्ये लावण्यात आले. त्याच वेळी खुद्द प्रियांका गांधी यांचाही कटआउट या दोन्ही नेत्यांच्याच उंचीचा ही लावण्यात आला.

काँग्रेसच्या रॅलीमध्ये घडलेला हा राजकीय बदल आहे. राहुल गांधी यांनी देखील सरदार वल्लभाई पटेल यांना श्रद्धांजली वाहताना मोदी सरकारवर टोलेबाजी करून घेतली आहे. देशातली लोकशाही वाचविणे ही सरदार वल्लभभाई पटेल यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. त्यानंतर प्रियांका गांधी यांच्या रॅलीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे कटआऊट दिसले आहेत. याचा अर्थच काँग्रेसने आता सरदार वल्लभाई पटेल यांचा वारसा आहे मिरवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

Gorakhpur : Cutouts of former PM Indira Gandhi and Sardar Vallabhbhai Patel put up at the venue of Congress party’s ‘Pratigya Rally’ where party general secretary Priyanka Gandhi Vadra will arrive shortly.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात