वृत्तसंस्था
लखनऊ : कोरोनाचे संकट वाढत असताना उत्तर प्रदेश सरकारने नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी दिली. नोकरदारांना कोरोनाची लागण झाली तर त्यांना २८ दिवसाची पगारी रजा द्या, असा आदेश काढला आहे. Good news for employees 28 days paid leave in case of corona; Decision in Uttar Pradesh
उत्तरप्रदेशमध्ये लॉकडाऊन लावण्यास सरकारचा विरोध आहे. पाच शहरात लॉकडाऊन लावण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.
अखेर सर्वोच्च न्यायालयातून आदेशाला स्थगिती मिळविण्यात सरकार यशस्वी ठरले होते. तेव्हा काय उपाययोजना सरकारने केल्या आहेत, असा जाब ही न्यायालयाने विचारला होता. त्यानंतर सरकारने उपाययोजनांना सुरुवात केली आहे.
कंपनी बंद पडली ; सुटीसोबत वेतनभत्ते द्या
दुकान किंवा कंपनीमध्ये १० पेक्षा जास्त व्यक्ती काम करीत आहेत, अशा ठिकाणी कोरोनाच्या उपाययोजना मुख्य दरवाज्याजवळ लावण्यास सांगितले. बाधित कर्मचाऱ्यांना २८ दिवसांची पगारी रजा देणे बंधनकारक केले आहे. बंद कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना सुटीसोबत वेतनभत्ते द्यावेत, असे आदेशात नमूद आहे. खासगी आणि सरकारी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना हा नियम लागू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App