विशेष प्रतिनिधी
श्रीनगर – फुटीरवादी नेता सय्यद अली शाह गिलानी यांचा मृतदेह हैदरपुरा येथील दफनभूमितून काढून तो जुन्या शहरातील इदगाह स्मशानभूमित दफन करण्यासाठी काही समाजकंटक सक्रिय झाल्याच्या वृत्ताने या भागात निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे शहरातील जनजीवन पाचव्या दिवशीही विस्कळित राहिले. Gilanis body can be shifted to another spot
गिलानी यांनी आपला मृतदेह ईदगाह दफनभूमीत दफन करावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. ईदगाह आणि हैदरपुराकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेडस लावण्यात आले आहेत. तसेच देखरेखीसाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. खबरदारीचे उपाय म्हणून हैदरपुरा आणि ईदगाह परिसरात निर्बंध लागू केले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही समाजकंटक गिलानी याचा मृतदेह ईदगाह येथील स्मशानभूमित दफन करण्यासाठी हैदरपुरा येथून काढण्याचा प्रयत्न करू शकतात. ईदगाह दफनभूमीत अनेक दहशतवादी आणि दोन फुटीरवादी नेते अब्दुल गनी लोन आणि मीरवाईज मोहंमद फारुख यांचे दफन करण्यात आले आहे.
Gilanis body can be shifted to another spot
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App