विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड उसळीमुळे उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत वर्षभरात ५० अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे. रिलायन्स उद्योग समुहाचे मुकेश अंबानी यांच्यापेक्षा त्यांची संपत्ती वेगाने वाढत आहे.Gautam Adani’s wealth increases by 50 50 billion in a year
2021 मध्ये उद्योगपती अदानींच्या एकूण संपत्तीत अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. अदानींची संपत्ती 50 अब्ज डॉलर्सने वाढली आहे, तर मुकेश अंबानींची संपत्ती 21.8 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. अंबानीपेक्षा अदानींच्या संपत्तीत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.
अंबानी आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असून, अदानी हे आशियातील दुसºया क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. जगात एकूण संपत्तीच्या बाबत सध्या टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क आघाडीवर आहेत. फ्रान्समधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अनॉल्ट दुसºया स्थानावर आहे. याशिवाय या यादीत मुकेश अंबानी 11व्या तर अदानी 13 व्या क्रमांकावर आहेत.
अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी हे भारतातील सर्वांत मोठे थर्मल कोळसा उत्पादक आणि कोळसा व्यापारी तसेच देशातील सर्वांत मोठे पोर्ट आॅपरेटर आहेत. अदानीच्या शेअर बाजारात सध्या सहा कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे.
याशिवाय अदानी समूह आपल्या सातव्या कंपनीचा आयपीओ लाँच करण्याचा विचार करीत आहे. गेल्या दोन आठवड्यात अदानी एंटरप्रायझेससे शेअर 21 टक्क्यांनी वाढले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App